आखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या वतीने बिरसा मुंडा जयंती व जनजाती गौरव दिन वाई (बा.) येथील कोलामखेड येथे उस्ताहाने साजरा. – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > आखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या वतीने बिरसा मुंडा जयंती व जनजाती गौरव दिन वाई (बा.) येथील कोलामखेड येथे उस्ताहाने साजरा.

आखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या वतीने बिरसा मुंडा जयंती व जनजाती गौरव दिन वाई (बा.) येथील कोलामखेड येथे उस्ताहाने साजरा.

Spread the love

NANDED TODAY:18,Nov,2021अविनाश पठाडे,वाई (बाजार.) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद माहूर शाखेच्या वतीने धरती के आबा बिरसा मुंडा जयंती व

जनजाती गौरव दिन वाई (बा) येथील कोलामखेड येथे उत्साहाने साजरा करण्यात आले, तत्पूर्वी कोलामखेडमध्ये आदिवासी

समाजाचे पारंपरिक घुसाडी नृत्याने संपूर्ण गावात शोभा यात्रा काढून बिरसा मुंडाच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी माहूर शहरमंत्री

दिव्या खराटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना १५ नोव्हेंबर ला धरती के आबा बिरसा मुंडा यांची जयंती, त्यांचे जीवन फक्त २५ वर्ष

इतकेच होते, पण एवढ्या कमी वयात त्यांचा अदभूत असा कार्यकाळ हा अतुलनीय आहे,

म्हणून बिरसा मुंडा हे ईश्वरीय रूप होते असे प्रतिपादन केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी

सीताराम मडावी होते, सूत्रसंचालन स्नेहल सोनूले तर रोहित तोडसाम यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मारुती मडावी,

रामा उईके, भुजंग मरापे, देवजी मेश्राम, नामदेव लुमसे, शंकर सलाम, लक्ष्मण मरापी, नागो खडके, रंगाराम कनाके समवेत अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

ABVP_MAHUR #बिरसामुंडाजयंती #जनजातीगौरवदिन

Total Page Visits: 648 - Today Page Visits: 2

Spread the love

Leave a Reply

Top