NANDED TODAY:05,Dec,2021 नांदेड – उत्तर मतदार संघातील सु सुगाव – वाघी – ढोकी या तिन्ही गावांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी 30-54 अंतर्गत 100 लक्ष तर जिल्हा नियोजन मधून 15 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून घेतला असून रविवारी नारळ फोडून या कामाचा शुभारंभ केला आहे.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, तालुकाप्रमुख जयवंत कदम, जिल्हा परिषदेचे घुटके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस.बी. नरमीटवार, मयुर कांबळे, उपतालुका प्रमुख संतोष भारसावडे, सर्कल प्रमुख गणेश बोकारे, सरपंच अनिल शिंदे, उपसरपंच संतोष लोखडे,
शाखा प्रमुख आम्रत भारसावडे, पांडुरंग शिंदे, बालाजीराव शिंदे, प्रवक्ते माधव महाराज, दिपक भोसले, धनंजय पावडे, पंडीतराव भारसावाडे, पंडीतराव भोसले, दादाराव भोसले, देविदासराव भोसले, चंपतराव भारसावडे, व्यकंटराव भोसले, गुलाब गुब्रे, संतोष भोसले, दत्ता भोसले, नर्सीगं भोसले यांच्यासह आदीजण उपस्थित होते.

शेतकऱ्यांचा प्रत्येक प्रश्न मार्गी लागला पाहिजे, शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मजबूत रस्ते तयार झाले पाहिजे, अशी भूमिका नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांची आहे. त्यांनी गेल्याच आठवड्यात राहटी येथील कॅनॉल रस्त्याचा प्रश्न देखील मार्गी लावला आहे.
या रस्त्याचे काम देखील सुरु आहे. रविवारी सुगाव – वाघी – ढोकी या तिन्ही गावांना जोडणारा अंतर्गत रस्त्यासाठी देखील जिल्हा नियोजन मधून आ. बालाजी कल्याणकर यांनी 30-54 अंतर्गत 100 लक्ष तर जिल्हा नियोजन समितीमधून पंधरा लक्ष असा एकूण 115 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून घेतला असून या कामाचा त्यांच्या हस्ते शुभारंभ देखील करण्यात आला आहे.
या रस्त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी देखील आ. बालाजी कल्याणकर यांचे शुभारंभ प्रसंगी आभार मानले आहेत.

नांदेड – मालेगाव रोड ते चिखली बु. गावाच्या मुख्य रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. याबाबत गावकऱ्यांनी रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी आ. बालाजी कल्याणकर यांच्याकडे केली होती.

आ. बालाजी कल्याणकर यांनी तात्काळ या रस्त्याला ग्रामविकास विभागाकडून गट 30 – 54 अंतर्गत 100 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देत, रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. शनिवारी आ. बालाजी कल्याणकर यांनी स्वतः कामाची पाहणी केली असून रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. यावेळी त्यांच्यासोबत धनंजय पावडे, दीपक भोसले यांच्यासह आदीजण उपस्थित होते.
नांदेड उत्तर मतदारसंघात आ. बालाजी कल्याणकर यांची अनेक विकास कामे सुरू आहेत. चिखली बु. गावचा मुख्य रस्ता अनेक दिवसापासून खराब झाला होता. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. त्यातच सध्या शेतकऱ्यांचा ऊस साखर कारखान्यांना जात असल्यामुळे, त्या वाहनांना देखील अडचणी निर्माण होत होत्या.
ही बाब चिखली बु. गावातील नागरिकांनी आ. बालाजी कल्याणकर यांच्या समोर मांडली असता, त्यांनी तात्काळ ग्रामविकास विभागाकडून गट 30 – 54 अंतर्गत 100 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुण दिला आहे.
संबंधित विभागाला सूचना देऊन रस्त्याचे काम सुरू करण्याबाबत सुचना केल्या होत्या. सध्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. शनिवारी आ. बालाजी कल्याणकर यांनी स्वतः या कामाची पाहणी केली असून रस्त्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. यामुळे चिखली बु. वासियांनी आ. बालाजी कल्याणकर यांचे आभार मानले आहेत.