NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

इंडियन इन्स्टिटयुट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनस्थानिक शाखा नांदेड संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

नांदेड, दि. 30 जून :- इंडियन इन्स्टिटयुट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन स्थानिक शाखा नांदेड या संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. इंडियन इन्स्टिटयुट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन नांदेड स्थानिक शाखेच्या सर्व सभासदांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक (प्रशासन) संलग्न जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे योगेशकुमार बाकरे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी तथा पदसिद्ध अध्यक्ष इंडियन इन्स्टिटयुट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन नांदेड शाखा यांच्या 23 जून 2025 च्या पत्रानुसार संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक (प्रशासन) संलग्न जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड योगेशकुमार बाकरे यांची नियुक्ती केली आहे.

या संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमानुसार एकूण 6 संचालक आहेत. चेअरमन 1 पद हे पदसिध्द आहे. दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी झालेल्या बैठकीतील ठराव क्रमांक 2 नुसार नांदेडचे जिल्हाधिकारी हे आयआयपीए इंडियन इन्स्टिटयुट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन नांदेड स्थानिक शाखेचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे आयएएस आहेत. उर्वरित पद व्हाईस चेअरमन 1, सेक्रेटरी 1, ट्रेझर 1, आणि एक्झीकेटयुव्ह मेंबर 2 असे एकूण 5 जागांची निवड करावयाची आहे. या संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमासह 1 जुलै 2025 संस्थेच्या पात्र मतदारांची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. 1 जुलै ते 15 जुलै 2025 या कालावधीत प्रारुप मतदार यादीवर आक्षेप नोंदविणे, प्राप्त झालेल्या आक्षेपाची छाननी 16 जुलै ते 17 जुलै 2025 या कालावधीत करण्यात येऊन 18 जुलै 2025 रोजी संस्थेच्या सभासदाची अंतिम मतदार यादी दुपारी 3 वा. प्रसिध्द करण्यात येणार आहे. 25 जुलै 2025 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत नामनिर्देशन पत्राचे वाटप व स्विकृती करण्यात येणार असून प्राप्त नामनिर्देशन पत्राची प्रसिध्दी दुपारी 12.15 वा. करण्यात येणार आहे. प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी दु. 12.15 ते 13 या कालावधीमध्ये करण्यात येणार असून वैध नामनिर्देशन पत्राची यादी 13.15 वा. प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच नामनिर्देशनपत्र 13.30 पर्यत माघारी घेता येणार आहे आणि निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी दु.14 वा. प्रसिध्द करण्यात येणार असून आवश्यकता असल्यास दु. 14.30 ते 15.30 या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. झालेल्या मतदानाची मतमोजणी मतदान संपल्यानंतर लगेच करण्यात येणार असून मतमोजणी संपल्यानंतर लगेच निकाल घोषित करण्यात येणार आहे.

संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी नांदेड मिटींग हॉल येथील नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात येणार असून अधिक माहिती निवडणूक निर्णय अधिकारी, संलग्न जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नांदेड येथील कार्यालयात पाहावयास मिळतील, असेही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.