एकजुटीने काम करून पक्ष संघटन वाढवा – जयसिंगराव गायकवाड राष्ट्रवादी शहर कार्यालयात आढावा बैठक.! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > एकजुटीने काम करून पक्ष संघटन वाढवा – जयसिंगराव गायकवाड राष्ट्रवादी शहर कार्यालयात आढावा बैठक.!

एकजुटीने काम करून पक्ष संघटन वाढवा – जयसिंगराव गायकवाड राष्ट्रवादी शहर कार्यालयात आढावा बैठक.!

Spread the love

NANDED TODAY:24,Nov,2021नांदेड/प्रतिनिधी आगामी काळात होणार्‍या निवडणुकीसाठी प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष संघटन अधिक मजबूत करून एकजुटीने आपण काम करावे असे आवाहन मराठवाड्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्क नेते तथा माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर लेन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये दि. 23 नोव्हेंबर रोजी आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मराठवाड्याचे संपर्क नेते तथा माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

यावेळी मार्गदर्शन करताना गायकवाड बोलत होते. पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की, प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या शहरामध्ये पक्ष संघटन कसे वाढेल याचे नियोजन करायला हवे.

प्रभागनिहाय पक्ष संघटनाचे नियोजन करायला हवे, महापुरूषांचे विचार आत्मसात करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खा. शरदचंद्र पवार यांना बळ देण्यासाठी आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार प्रत्येकाच्या घरात पोहचून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्‍नांची सोडवणुक करावी व सर्वांनी एकजुटीने पक्षसंघटन वाढविण्यासाठी असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम मत व्यक्त करताना म्हणाले की, नांदेड शहरामध्ये आगामी काळात निवडणुका असून या निवडणुकीच्या

अनुंषगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनात्मक बांधणीच्या कामाला जोमाने लागलेला आहे. आता प्रत्येक कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी मी जिंकणार असा निर्धार करून संघटन वाढवावे आपआपसात हेवे-देवे बाजूला ठेवावे, असे कदम यांनी सांगितले. तसेच नांदेड शहरातील आगामी काळातील होणार असलेल्या निवडणुकीसंदर्भात विस्तृत आढावा त्यांनी सादर केला.

यावेळी कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी आम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी जोमाने काम करणार आहे, आम्हाला पद नको केवळ यश संपादन करण्यासाठी काम करू अशा स्वरूपातील भुमिका याठिकाणी अनेकांनी व्यक्त केल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, बलीकोद्दीन साकीद, माजी विरोधी पक्षनेता जीवन पाटील घोगरे, जर्नेलसिंघ गाडीवाले, अ‍ॅड. रामचंद्र पतंगे, गणेश तादलापूरकर, सिंधुताई देशमुख, मोहमदी पटेल,

धनंजय सुर्यवंशी, गंगाधर कवाळे, युनूस खान, श्रीधरराव नागापूरकर, शफी उर रहेमान, कमलबाई लांडगे, एकनाथ वाघमारे, भीमराव क्षीसागर, राहूल जाधव, जिलानी पटेल, कन्यक चिद्रावार, लक्ष्मण भवरे, बल्लू यादव,

सईदा शेख, तरविंदर सिंघ, किशोर सुर्यवंशी, तुलसे नागसेन, दत्ता पाटील तळणीकर, मारोती चिवळीकर, संजय गुंडाळे, दिलीप ठाकूर, संतोष कोकाटे, हसीना बेगम, अशिया बेगम, रजिया बेगम, निलोफर बेगम, वर्षा फुलपगार,

वंदना कोकाटे, समीर कुलकर्णी, योगेश भरकड, अमित कांबळे, विक्की पाटील, आकाशसिंह ठाकूर, रहेमत अली खान, ऋषीकेश पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची या बैठकीला उपस्थिती होती.

Total Page Visits: 443 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top