
नांदेड – ०१/०२/२०२१ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड आगाराचे पाच चालक कर्मचारी वयाचे ५८ वर्षे पूर्ण करुन प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल संपूर्ण नांदेड आगाराच्यावतीने दि. ३१ जानेवारी २०२१ रविवार रोजी कोविड-१९ चे शासन नियम पाळून त्यांचा सपत्नीक सत्कार करुन शुभेच्छारुपी निरोप देण्यात आला. यामध्ये श्री. मिर्झा महेबुब बेग ३७ वर्षे, शिवराज शंकरअप्पा ध्याडे ३१ वर्षे, वामन चांदोजी राजभोज ३३ वर्षे, सरदार बलबिरसिंघ महेंद्रसिंघ २४ वर्षे, बल्लव त्र्यंबकराव जावरे २७ वर्षे यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक मा. श्री. पुरुषोत्तम ता. व्यवहारे हे होते तर विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक श्री. सुजीत मरदोडे, संदीप गादेवाड, कामगार संघटनेचे संजय मादास, शिवराज पेंडकर, कामगार सेनेचे प्रादेशिक सचिव सुधीरभाऊ पटवारी, पाचही सत्कारमूर्ती सेवानिवृत्त कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम संयोजन समितीच्यावतीने श्री.एम.डी. गौस, गुणवंत एच. मिसलवाड, राजेश गट्टू, आतिश तोटावार, गोविंद फुले, शकील अहेमद यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पहाराने हृदय सत्कार केला. यावेळी आगार व्यवस्थापक मा. श्री. पुरुषोत्तम ता. व्यवहारे व सर्व मान्यवरांच्या हस्ते पाचही सत्कारमूर्तींचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, स्मृतीचिन्ह व प्रवास बॅग देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सर्व मान्यवरांचे समयोचित भाषणे झाली. शेवटी अध्यक्षीय समारोप श्री. पुरुषोत्तम व्यवहारे यांनी केले. ते आपल्या भाषणात म्हणाले की, पाचही चालक बांधवांनी प्रवासी सेवेमध्ये मोलाचे योगदान दिलेले असून आपण सर्वांनीच त्यांच्या कार्याप्रती आदर्श घेऊन प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याची काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन प्रमुख वक्ते तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार पुरस्कृत एसटी मेकॅनिक सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. एम.डी. गौस यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वश्री राजेंद्रकुमार निळेकर, शकील अहेमद, राजेश गहिरवार, बी.जी. घागरदरे, एन.डी. पवार, गंगाधर वाघमारे, डी.जी. उगले, एन.व्ही. बडवने, दौलत पाटील, कांतीलाल दुर्गे, चंद्रकांत कदम, जय कांबळे, ऍड. राहुल सोनटक्के, संदीप देशमुख, अश्लेष सोनकांबळे, केशव टोंगे, बाळू हाटकर, पी.एन. तुप्पेकर, जी.बी. काजळे, एस.यु. टाक, मंगेश कांबळे, उमेश पुयड, अतुल कांबळे, रशीद पटेल इत्यादींनी मोलाचे परिश्रम घेतले.