
एस टी कर्मचाऱ्यांना परवडत नसेल तर नोकरी सोडून द्यावी- विश्वनाथ शिंदे
NANDED TODAY:9,Nov,2021 सध्या महाराष्ट्रात खुप ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे या संपास एस टी कर्मचाऱ्यांचा खुप मोठ्या प्रमाणात पाठिंबा देखील वाढत आहे एस टी कर्मचाऱ्यांना त्यांच प्रशाशकीय यंत्रणे मध्ये
विलिनीकरण व्हाव अस वाटत आहे त्यांचा पगार कमी आहे त्यांना परवडत नाही अशा अनेक मागण्यांसाठी त्यांनी संप पुकारला आहे. संप पुकारल्यामुळे एस टी महामंडळावर बोजा वाढण्याची शक्यता आहे एस टी महामंडळावर जर बोजा वाढला

तर तिकिट देखील वाढण्याची दाट शक्यता आहे,यावर लवकर तोडगा काढावा नाहीतर नाही तर तुमचेही नुकसान होईल आणि महामंडळावर बोजा देखील वाढु शकतो. लोकशाहीमध्ये संप पुकारण्याचा अधिकार आहे यामध्ये आमच दुमत नाही
पण जर एस टी कर्मचाऱ्यांना परवडत नसेल तर त्यांनी खुशाल नोकरी सोडावी कारण ऐवढ्याच पगारीवर महाराष्ट्रातील असंख्य तरुण(बेरोजगार) नोकरी करायला तयार आहेत त्यामुळे ज्या एस टी कर्मचाऱ्यांना परवडत नसेल त्यांनी

नोकरी सोडून कायम संपावर जावे.एस टी कर्मचाऱ्या बद्दल आमच्या मनात खुप आदर आहे पण आम्हा तरूण बांधवांना तरी कुठे नोकरी आहे त्यामुळे तरी निदान आम्हा तरूण बांधवांना तरी रोजगार भेटेल असं वादग्रस्त वक्तव्य नांदेड जिल्ह्यातील विश्वनाथ शिंदे या तरुणाने केले आहे.
