काही विकासकामे व्हावी ही ईश्‍वराची मर्जी असावी म्हणून मला काम करण्याची संधी मिळत आहे, खा.प्रतापराव पा.चिखलीकर यांचे प्रतिपादन – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > काही विकासकामे व्हावी ही ईश्‍वराची मर्जी असावी म्हणून मला काम करण्याची संधी मिळत आहे, खा.प्रतापराव पा.चिखलीकर यांचे प्रतिपादन

काही विकासकामे व्हावी ही ईश्‍वराची मर्जी असावी म्हणून मला काम करण्याची संधी मिळत आहे, खा.प्रतापराव पा.चिखलीकर यांचे प्रतिपादन

Spread the love

NANDED TODAY:26,Oct,2021 बिलोली : देगलुर बिलोलीसह जिल्ह्यातील काही विकासाचे काम माझ्या हातून व्हावे अशी ईश्‍वराची मर्जी असावी म्हणून मला या भागांमध्ये काम करण्याची संधी मिळत आहे.

असे प्रतिपादन जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पा.चिखलीकर यांनी केले आहे.ते देगलुर विधानसभा पोट निवडणूकीचे भाजपा उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारार्थ बिलोली तालुक्यातील भजनी मंडळ व प्रवचनकारांच्या बैठकीत बोलत होते.

पुढे बोलताना चिखलीकर म्हणाले,गेल्या अनेक वर्षापासून मी राजकारण करत असताना कधीही दुजाभाव न करता नेहमीच विकास कामांवर भर देण्याचा प्रयत्न केला आहे.काम करण्याची प्रामाणिक इच्छा असल्यामुळेच मला तळागळातील सर्वच लोकांचा पाठिंबा मिळत गेला.

लोकांच्या सहकार्यामुळेच गत दोन वर्षापुर्वीच्या लोक सभा निवडणूकीत जिल्ह्यातील मतदारांनी मला जिल्ह्याची सेवा करण्यासाठी पंतप्रधान देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली आहे.

या मतदार संघाच्या विकासासाठी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करण्यासाठी देगलुर विधानसभा पोट निवडणूकीतील भाजपा व मिञ पक्षाचे अधिकृत उमेदवार सुभाष पिराजीराव साबणे यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचे आवाहन केले.

यावेळी माजी मंत्री बबणराव लोणीकर यांनीही उपस्थीतांशी विस्तृत अशी चर्चा केली.यावेळी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Total Page Visits: 540 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top