किनवट: ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफ किनवट ची कार्यकारिणी जाहीर ..! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > किनवट: ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफ किनवट ची कार्यकारिणी जाहीर ..!

किनवट: ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफ किनवट ची कार्यकारिणी जाहीर ..!

Spread the love

NANDED TODAY KINWAT: 04,July,2021 किनवट(अकरम चव्हाण) ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफ किनवट ची एक बैठक दि.4 जुलाई रोजी इन्साफचे जिल्हाध्यक्ष अब्दुल बशीर माजीद यांच्या अध्यक्षतेखाली किनवट चे एन-के गार्डन मध्ये आयोजित करण्यात आली होती, सदर बैठकीत किनवट तालुका,शहर,युवक,स्टूडेंट विंग ची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

ही कार्यकारिणी इन्साफचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.जुबैर खान,मोईन कुरेशी,नांदेड शहराध्यक्ष हाफीज शाहेद उल इस्लाम,यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली आहे.

यात,किनवट तालुका अध्यक्षपदी शेख अय्यूब (बिल्डर), ता.उपाध्यक्ष मो. एजाज़ मो. इसाक,ता.सचिव फ़हीम क़ुरैशी, शहर अध्यक्ष शेख आसिफ शेख रफ़ीक,शहर उपाध्यक्ष तौफीक अज़ीज़ गौड़,शहर सचिव सैयद इरफान,कोषाध्यक्ष मिर्ज़ा साबेर बेग,उमर चव्हाण तर सल्लागार म्हणून नसीर तगाले (सम्पादक आजकी न्यूज़)यांची सर्वानुमते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली आहे.

तसेच युवक तालुका अध्यक्ष पदी शेख समीर, युवक शहर अध्यक्ष शरद कोटपल्लीवार, युवक तालुका उपाध्यक्ष संजय कोतुरवार, युवक ता. सचिव मो. सोहेल, युवक शहर उपाध्यक्ष अमीर खान,युवक शहर सचिव शेख अज़हर,युवक सरचिटणीस राजू येन्नावार,जुबेर पठान आदि ची नियुक्ति करण्यात आलि आहे,
तसेच स्टूडेंट विंग च्या तालुका अध्यक्ष पदी फ़ारूक़ चव्हाण यांची नियुक्ति करण्यात आली आहे..!

Total Page Visits: 935 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top