
NANDED TODAY : 23,July,2021 ( AKRAM CHAVHAN ) किनवट :-मंगळवारच्या रात्रीपासून पावसाने हजेरी लावली बुधवारी सकाळपासूनच झड कायम राहिली त्यानंतर रात्री पावसाचा जोर वाढला अतिवृष्टी झाल्याने गुरुवारी १४१ मि मि इतक्या पावसाची नोंद झाल्याने पैनगंगा नदी दुथडी
भरून वाहिली त्यामुळे पैनगंगा नदीला जोडणारे छोटे मोठे नाले तुंबले परिणामी पैनगंगा नदी काठच्या जमिनी पाण्याने वेढून शेतात पाणीच पाणी झाले होते किनवट शहराला लागून असलेल्या नाल्या काठच्या मोमीनपुरा भागात कांही घरे

पाण्याखाली आल्याचे चित्र होते नदी काठच्या शहरातील गंगानगर, भोईगल्ली,रामनगरच्या पाठीमागील भाग,मोमीनपुरा, मामीनगुडा भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे तालुक्यातील जलधरा
मंडळात २०७ मि मि पावसाची नोंद झाली आहे पूरपरिस्थिती उदभवल्यास त्याचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून त्या दृष्टीने सहा जिल्हाधिकारी कीर्ती किरण एच पुजार,तहसीलदार, उत्तम कागणे,नगराध्यक्ष आनंद मच्छेवार,पोलीस

निरीक्षक मारोती थोरात ,नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक चंद्रकांत दुधारे यांनी भर पावसात शहराचा भाग पिंजून काढला पावसाचा जोर वाढला तर गंगानगर च्या कांही भागातील लोकांना कॉस्मोपॉलिटन विद्यालयात,
रामनगरच्या पाठीमागील वस्तीतील लोकांना समाज मंदिर येथे,मोमीनपुरा व मामीनगुडा या वस्तीतील लोकांना उर्दू शाळेत सुरक्षित ठिकाणी हलविले जाणार आहे तसे आवाहन ध्वनिक्षेपकाद्वारे नगरपालिका करत आहे नागरिकांना

मनस्ताप देणारा किनवट भोकर नांदेड हा राष्ट्रीय महामार्ग दि २१ जुलै पासून बंद आहे नांदेडहुन किनवट ला येणाऱ्या एसटी बसेस जलधरा,गोकुळनगर ( चिखली) व खैरगाव या ठिकाणी पुलाचे काम सुरू असल्याने डायव्हर्शन वाहून गेल्याने नऊ
बसेच तिथेच थांबून आहेत नांदेड जाणाऱ्या व येणाऱ्या पंधरा फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत आगाराच्या एकूण ४७ फेऱ्या रद्द झाल्याचे आगाराच्या सूत्रांनी सांगितले आहे त्यामुळे तीन लक्ष रुपयांचा फटका आगाराला बसला आहे

अतिवृष्टीमुळे किनवट तालुक्यातील नाल्याच्या काठच्या व पैनगंगा नदी काठच्या शेतात पुराचे पाणी शिरून खरीप पिके पाण्याखाली आली आहे तर काही पिके वाहून गेल्याची शक्यता आहे चिखली बु भागात नाल्या लगतच्या शेतात
पाणी शिरून मोठे नुकसान झाल्याने नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी होत आहे तशी मागणी बालाजी बामणे यांनी केली आहे किनवट तालुक्यातील सात मंडळात याप्रमाणे पावसाची नोंद झाली आहे किनवट १०४ मि

मि, बोधडी १४९,जलधरा २०७,इस्लापुर १७५,शिवणी १७४,मांडवी ९० व दहेली ९२ इतक्या पावसाची नोंद झाली आहे किनवट तालुक्यातील वातावरण जलमय झाले होते पाऊस वाढला तर नगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक अलर्ट करण्यात
आले आहे अशी माहिती नगरपालिका सूत्रांनी दिली आहे पुराचा धोका वाढण्याची शक्यता पहाता नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन तहसीलदार उत्तम कागणे यांनी केले आहे पैनगंगा नदीला पूर नदी काठावर आले पर्यटनाचे स्वरूप किनवट
ते उमरखेड रस्त्यावर पैनगंगा नदी च्या खरबी पुलाच्या अलीकडे पूर पाहण्यासाठी शहर वासीयांची मोठी गर्दी पहावयास मिळत होती पुलाकडे लोक जाऊ नये म्हणून पोलिसांनी बॅरिगेट लावले होते या रस्त्यावर पर्यटकांची जणू कांही गर्दी पहावयास मिळाली