कोरोनाग्रस्त रूग्णांच्या मदतीसाठी नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँगे्रसकडून रक्तदान शिबिर107 बाटल्या रक्त संकलीत..! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > कोरोनाग्रस्त रूग्णांच्या मदतीसाठी नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँगे्रसकडून रक्तदान शिबिर107 बाटल्या रक्त संकलीत..!

कोरोनाग्रस्त रूग्णांच्या मदतीसाठी नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँगे्रसकडून रक्तदान शिबिर107 बाटल्या रक्त संकलीत..!

Spread the love

NANDED TODAY:3,May2021 नांदेड/प्रतिनिधी कोरोना संसर्गजन्य आजाराची लागण झालेल्या रुगणांच्या उपचारासाठी रक्ताची गरज लक्षात घेऊन टीचर्स क्लब रुग्णालय कौठा नांदेड येथे नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

या रक्तदान शिबाराचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल चे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद खान पठाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे देशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील, मनपा नांदेड चे माजी विरोधी पक्ष नेते जीवन पा. घोगरे, माजी सभापती भाऊसाहेब गोरठेकर, राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष दगडगावकर, प्रा. मझरोद्दीन,

राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड विधानसभाअध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भोकर तालुकाध्यक्ष शिवाजी कदम, शिवाजीराव वाडीकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशसचिव बाळासाहेब भोसीकर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या उपाध्यक्ष रेखाताई आहिरे, रवींद्रसिंघ पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या रक्तदान शिबिरात 107 दात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदान करणार्‍या रक्तदात्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या रक्तदान शिबीरातील रक्त गोळवलकर गुरुजी रक्तपेढी यांनी रक्तसंकलन केले.

या रक्तदान शिबाराचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हासरचिटणीस डी.बी. जांभरूनकर, व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन पापंटवार यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खेळगे, नारायण शिंदे, डॉ. तहाडे, अनमोलसिंग कामठेकर, सूर्यकांत कावळे, गोपाळराव पेंडकर, सूर्यकांत गायकवाड, डॉ. मंडले मॅडम, सुरेंद्र डांगे यांनी परिश्रम घेतले.

Total Page Visits: 926 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top