खरीप हंगामाचे नियोजन करा : खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांची कृषी मंत्री यांच्याकडे मागणी..! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > खरीप हंगामाचे नियोजन करा : खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांची कृषी मंत्री यांच्याकडे मागणी..!

खरीप हंगामाचे नियोजन करा : खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांची कृषी मंत्री यांच्याकडे मागणी..!

Spread the love

NANDED TODAY:29,April,2021 नांदेड : कोरोना महामारीचे संकट कमी झाल्यानंतर शेतकरी आणि व्यापारीबांधवांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार असून याची तीव्रता कमी करण्यासाठी शेतकयांसाठी कर्ज, पिकविमा नोंदणी,

पिकविमा तसेच बियाण्यांची गुणवत्ता टिकवण्यासाठी व शेतकरी यांना अडचणी चा सामना करावा लागू नये यासाठी खरीप हंगामाचे नियोजन करावे अशी मागणी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

कृषिमंत्री यांना दिलेल्या निवेदनात खा.चिखलीकर यांनी म्हटले आहे की कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशा अस्मानी संकटामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे.त्यातल्या त्यात चालू असलेल्या कोरोना संकटाने शेतकरयांना उध्दवस्त केल्यागत स्थिती असून लवकरच खरीप हंगामाला सूरवात होणार आहे.

या हंगामात शेतकरी बांधवांना अडचण येऊ नये यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार, गुणवत्तापूर्वक बि-बियाणे व खते उपलब्ध करून देणे, बँकांनी पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे या बाबतच्या सुचना जिल्हाधिकारी, कृषी खात्याच्या अधीक्षकांना व सर्व संबंधितांना द्याव्यात.

पेरणीपूर्वी शेतकरी बांधवांना कर्जाचे वाटप करावे, कर्जाचा अर्ज सोपा ठेवावा व सर्व बँकांसाठी एकच अर्ज ठेवावा जेणेकरून शेतकरी बांधवांना कर्ज घेतांना कुठलीच अडचण होणार नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना पेरणीपूर्व पिक विमा मिळवून द्यावा. तसेच यासाठी खरीप हंगामाचे नियोजन आवश्यक असृल्याचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री, विरोधी पक्षनेते यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.

Total Page Visits: 994 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top