
NANDED TODAY:04,April,2021 नांदेड /हिंगोली : हदगाव तालुक्यातील काळेश्वर पेव्हा येथील ज्ञानेश्वर जाधव यांना फुफुसाचा आजार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी आर्थिक मदत लागत असताना खासदार हेमंत पाटील यांनी शिफारस करून प्रधानमंत्री राहत कोषामधून ५० हजार रुपयाची मिळवून दिली , त्यांच्यावर हैद्राबाद येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत .
गंभीर आजार झाल्यानंतर सर्व सामान्य गरीब कुटुंबातील कोणताही व्यक्ती आर्थिक मदतीपासून वंचित राहू नये याची पुरेपूर काळजी खासदार हेमंत पाटील गांभीर्याने घेत असतात , त्याकरिता स्वतंत्र आरोग्य यंत्रणा उभारून एका आरोग्यदूताची नेमणूक खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे .
हिंगोली लोकसभा मतदार संघातील हदगाव तालुक्यातील निवघा सर्कल मधील काळेश्वर पेव्हा येथील ज्ञानेश्वर जाधव यांना बऱ्याच दिवसापासून फुफुसाचा आजार झाल्यानंतर श्वसनाचा सतत त्रास होत होता याकरिता त्यांनी नांदेड पासून हैद्राबाद पर्यंत सर्व रुग्णालयात दाखवून उपचार घेतले आजही त्यांच्यावर उपचार सुरु आहेत परंतु परिस्थिती हलाखीची असताना परिवाराने आजवर खर्च केला परंतु दर महिन्याला औषध उपाचारकरिता पैसे लागत असल्याने त्यांनी आर्थिक मदतीकरिता खासदार हेमंत पाटील यांच्याकडे फेब्रुवारी महिन्यात मदतीची मागणी केली होती .
खासदार हेमंत पाटील यांच्या कार्यालयातून त्यांना प्रधानमंत्री राहत कोषाची माहिती देण्यात आली व यातून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आणि अवघ्या महिन्याभरात जाधव यांना औषध उपचाराकरिता ५० हजार रुपयाची मदत मिळवून देण्यात आली असून त्यांच्यावर हैद्राबाद येथील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून दिल्यामुळे जाधव कुटुंबीयांनी खासदार हेमंत पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे.