घरी शार्ट सर्किट मूळे सामान जळुन नुकसान:रा.स्व.संघ जनकल्याण समिती तर्फे शेर बानो शेख यांना मदतीचा हात..! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > घरी शार्ट सर्किट मूळे सामान जळुन नुकसान:रा.स्व.संघ जनकल्याण समिती तर्फे शेर बानो शेख यांना मदतीचा हात..!

घरी शार्ट सर्किट मूळे सामान जळुन नुकसान:रा.स्व.संघ जनकल्याण समिती तर्फे शेर बानो शेख यांना मदतीचा हात..!

Spread the love

NANDED TODAY:06,March,2021 नांदेड़ मधे शेरबानो मेह्बुबीया शेख यांच्या घरी 3मार्च बुधवार रोजी सायंकाळी मराठवाडा खादी ग्रमोद्योग बाफना रोड येथील कर्मचारी श्रीमती शेर बानो मेहबुबिया शेख यांच्या घरी शार्ट सर्किट मूळे आग लागली यामधे त्यांच्या घरातील सर्व सामान जळुन नुकसान झाले!

ही अपत्ती रा.स्व.संघ जनकल्याण समितीला कळताच जि ल्हा कार्यवाह प्रदिप व्यसनेकर जिल्हा अध्यक्ष प्रकाश पोपशेटवारआपत्ती प्रमुख मुकुंद धनोरकर सदर जागेला भेट दिली व तत्काळ मदतीचा हात समोर केला.

कोठेही आपत्ती आल्यास जनकल्याण समिती जात पात धर्म न पाहता आपत्ती निवारणासाठी तत्पर कार्यरत असते. असाच एक प्रत्यय नांदेड़ मधे शेर बानो मेह्बुबीया शेख यांच्या घरी घडला .

घरातील सर्व सामान जळून गेलेल्या निराधार महिलेस आधारची गरज असताना तात्काळ मदतीचा हात म्हणून संसारासाठी लागणारया गृहपयोगी वस्तू भांडी किराणा सामान मिक्सर अशा जिवनोपयोगी वस्तू देऊन त्यांच्या दुःखात सहभागी होउन आधार देण्याचा प्रयत्न जनकल्याण समिती नांदेड़ तर्फे करण्यात आला.

यावेळी जिल्हा कार्यवाह प्रदीप व्यसनेकर अध्यक्ष प्रकाश पोपशेटवार आपत्ती प्रमुख मुकुंद धनोरकर यानी मदत केली.यावेळी खादी ग्रमोद्योग चे कर्मचारी अधिकारी उपस्थीत होते.त्यानी जनकल्याण समितीच्या कार्याचे कौतुक केले.

Total Page Visits: 1118 - Today Page Visits: 4

Spread the love

Leave a Reply

Top