
NANDED TODAY:05,Dec,2021 जागतिक पातळीवर सर्व देशांनीं ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा साठ वर्ष मान्य केलेली आहे.आपल्या देशातील सर्वच राज्यातही ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा साठ वर्ष मान्य आहे.
जागतिक पातळीवर सर्वच राष्ट्रात व भारतातील इतर राज्यातहि ज्येष्ठ नागरिकांचे धोरन व मान्य धोरनानुसार त्यांना सर्व सुखसोई दिल्या जातात.त्यांचे पालन,पोषण तथा सांभाळ केला जातो.

शारीरिक,मानसिक तथा भावनिक आरोग्याची काळजी घेतली जाते.त्यांच्यासाठी वेग वेगळी कायदे तयार करून अंमलात आनली जातात.त्यांना वृधाप काळात सन्मानाने व स्वाभीमानाने जगता यावे असी तरतूद केली जाते.
महाराष्ट्र राज्याच्या शेजारील राज्यात ज्येष्ठांना प्रतिमहा मान धन दिले जाते.एवढेच नाही तर आंध्र प्रदेशात तर मृत्यू नंतर त्यांच्या अंतविधी साठी सुद्धा अर्थिक मदत व इतरही सहकार्य केले जाते.
.
याउलट महाराष्ट्रात शासन ज्येष्ठ नागरिकांची वयो मर्यादा पासष्ट (65 )वर्ष ग्राह्य धरते.ज्येष्ठ नागरिक धोरन अंमलात आणत नाही.महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिक अत्यंत वाईट परिस्थितीत जीवन जगत आहेत.
.
शहरी पेक्षा ग्रामिन भागातील ज्येष्ठांची परिस्थिती अत्यंत दयनीय तथा केविलवानी आहे.त्यांच्या जवळ अन्न,वस्र,निवारा, औषधी तथा अप्त या गोष्टींचाही(प्राथमिक गरजांचाही) पत्ता नाही.
मृत्यू येत नाही व विष प्राशन करून जीवन यात्रा संपवावी तर पाच पैशे त्यांच्या जवळ नाहित.!ते कसेबसे जीवन जगत आहेत.! म्हणून सरकारने किमान गरजू,उपेक्षित, वंचित,दुर्लक्षित शेतकरी,शेत मजूर ,कष्टकरी तथा कामगार इ.ज्येष्ठ नागरिकानां या अधिवेशनात त्वरित 3000 रू प्रतिमहा मानधन मान्य करावे.
.
गेली अनेक वर्षापासून महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ(फेस्काॅम)ही ज्येष्ठ नागरिकांची महा संघटणा ज्येष्ठ नागरिकांचे या सह अनेक प्रलंबित प्रश्न शासन दरबारी सातत्याने मांडून सोडवून घेण्याचा अहोरात्र प्रयत्न करत आहे.

नांदेड वजिराबाद चौकस्थित सहयोग ज्येष्ठ नागरिक संघटणेच्या वतिने या मागण्या मान्य करून घेण्यासाठी अनेक वेळा शासनाचे लक्ष्य वेधून प्रश्न सोडवून घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांचे मूक मोर्चे,धरने,रास्ता रोकोअदि निष्फळ अंदोलने करण्यात आली.आज पर्यंतच्या सरकारने ज्येष्ठाच्या प्रलंबित प्रश्नांकडे व मागण्याकडे अक्षम्य दूर्लक्षच केले आहे.
त्यातच नियतिने कधी अवर्षण, तर कधी अतिवृष्टी, व वयापरत्वे रक्त दाब,मधूमेह,दृष्टी दोष,कर्ण बधिरता,संधी वात, दमा,क्षय, हृदयरोग, स्मृतीभ्रंश, कर्करोग, भूकमारी इ.तर कधी कोरोना सारखी महामारी या सारख्या आजारांनीं सुद्धा ज्येष्ठांना आपले लक्ष्य केले.!
.
या कोरोना महामारित तर ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने मृत्यू मुखी पडले.!
.
“या येत्या 22/12 ला मुंबई येथे होत असलेल्या हिवाळी विधीमंडळाच्या अधिवेशनात जर या महा विकास आघाडी सरकारने ज्येष्ठांचे अतिप्रलंबित प्रश्न सहानुभूतीपुर्वक सोडविले,ज्येष्ठ नागरिक धोरन अंमलात आणले, वयोमर्यादा साठ वर्षच मान्य केले व इतर राज्या प्रमाने प्रतिमहा तिन हजार मानधन मान्य केले तर

” ज्येष्ठ नागरिकांना नियतिने मारले, पण या महाविकास आघाडी सरकारने मात्र तारले..!”
असी भावना सकल ज्येष्ठ नागरिकांची होईल.!
.
आणि संपूर्ण महाराष्ट्रातील 18% ज्येष्ठ ,अनुभवी व विश्वासू ज्येष्ठ नागरिक मतदार या सरकारच्या पाठीमागे खंबीर पणे उभा राहिल. एवढेच नव्हे तर कुटूंबातला एक ज्येष्ठ नागरिक हा एक ते सहा (स्वताः,पत्नी,मुलं-सुना,मुलगी- जावाई) मतांचा हुकमी एक्का आहे.!येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच निवडणूकित नाही तर सर्व सार्वत्रिक निवडणूकित सुद्धा हा मतदार सरकारातील पक्षांना मतदान करेल यात तिळमात्र शंका नाही.!
.

सरकारने अजूनही ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्याकडे जर साहानभुतिने पाहीले नाही व मागण्या मान्य केल्या नाहीत तर शासनाच्या नामुस्कीची तमा न बाळगता या वयातही ज्येष्ठ नागरिकांना सरस्त्यावर उतरून अन्न -पाणी त्याग,प्राण त्यागादी अंदोलने करण्याशिवाय दुसरा पर्यायच उरणार नाही.!