ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद उमाटे यांना विभागीय ‘दर्पण’ पुरस्कार – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद उमाटे यांना विभागीय ‘दर्पण’ पुरस्कार

ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद उमाटे यांना विभागीय ‘दर्पण’ पुरस्कार

Spread the love

NANDED TODAY:19,May,2022 (प्रतिनिधी)- नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार व लातूरच्या दैनिक ‘मराठवाडा नेता’चे जिल्हा प्रतिनिधी प्रल्हाद गणपतराव उमाटे यांना महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा प्रतिष्ठेचा

मराठवाडास्तरीय दर्पण पुरस्कार देण्यात येत असल्याची घोषणा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ व उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर यांनी केली असून

हा पुरस्कार येत्या 6 जानेवारी 23 रोजी दर्पण दिनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी पोंभुर्ले जि.सिंधुदुर्ग येथे प्रदान करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनी विविध दर्पण पुरस्कारांची घोषणा केली. त्यानुसार धाडसी महिला पुरस्कार

सौ. शीतल करदेकर (विशेष प्रतिनिधी दैनिक वृत्त मानस, मुंबई), दर्पण पुरस्कार पश्‍चिम महाराष्ट्र विभाग अनुराधा कदम (उपसंपादक दैनिक तरुण भारत, कोल्हापूर),

विदर्भ विभाग प्रा. राजेंद्र मुंडे (ज्येष्ठ पत्रकार वर्धा), उत्तर महाराष्ट्र विभाग जयप्रकाश पवार (निवासी संपादक दैनिक दिव्य मराठी, जळगाव), कोकण विभाग शैलेश पालकर

(संपादक महावृत्त डॉटकॉम रायगड), सुरेश कौलगेकर (प्रतिनिधी दैनिक पुण्यनगरी वेंगुर्ले), विशेष दर्पण पुरस्कार किरण बोळे (प्रतिनिधी दैनिक सकाळ फलटण), स.रा.मोहिते (प्रतिनिधी दैनिक जनमत फलटण)

Total Page Visits: 1552 - Today Page Visits: 2

Spread the love

Leave a Reply

Top