NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

झाडलाव मोहीम अंतर्गत हैदरबाग क्र. 1, नांदेड येथे वृक्षारोपण


नांदेड, 9 जुलै 2025
शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या झाडलाव मोहिमेअंतर्गत हैदरबाग क्र. 1, नांदेड येथे वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
या प्रसंगी ज्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, त्यामध्ये मा. रऊफ जमीनदार, सुलतान मिर्झा, जावेद अहमद, उमर फारूक, सय्यद एजाज, सलामभाई आणि शुभम वाघमारे यांचा समावेश होता. या सर्वांनी उत्साहाने झाडं लावून पर्यावरण संरक्षणात आपला मोलाचा वाटा उचलला.
कार्यक्रमाच्या वेळी हैदरबाग क्र. 1 मधील अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि भविष्यातही अशाच सामाजिक आणि पर्यावरणपूरक कार्यात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.