तरोडा बु. येथील रुग्णालय तात्काळ सुरू होणार: आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी विपीन इटनकर व आयुक्त सुनील लहाने यांनी केली पाहणी – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > तरोडा बु. येथील रुग्णालय तात्काळ सुरू होणार: आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी विपीन इटनकर व आयुक्त सुनील लहाने यांनी केली पाहणी

तरोडा बु. येथील रुग्णालय तात्काळ सुरू होणार: आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी विपीन इटनकर व आयुक्त सुनील लहाने यांनी केली पाहणी

Spread the love

NANDED TODAY: 15,April,2021 नांदेड – प्रभाग क्रमांक दोन मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत बांधण्यात आली आहे. मात्र त्या इमारतीत रुग्णालय अद्याप सुरू करण्यात आले नाही. नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना सोबत घेऊन पाहणी केली असून लवकरात लवकर हे रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी संगितले आहे.

यावेळी आ.बालाजी कल्याणकर यांच्यासोबत जिल्हाधिकारी विपीन इटनकर, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त सुनील लहाने, उपयुक्त सद्धू महाराज, तहसीलदार किरण आंबेकर, सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. अजयसिंह बिसेन, नगरसेवक सतीश देशमुख, सखाराम तुपेकर, संतोष मुळे, धम्मा कदम यांच्यासह आदीजण उपस्थित होते.

कोरोना महामारी च्या काळात आपल्या जवळच वैद्यकीय सेवा असणे गरजेचे झाले आहे. सध्या महानगरपालिकेने देखील प्रत्येक प्रभागात कोरोना तपासणी सुरू केली आहे. तसेच काही मुख्य रुग्णालयात कोरोनाची लस देखील दिली जात आहे. प्रभाग क्र. दोन मधे सध्या रुग्णालय खाजगी जागेवर सुरू आहे. ही जागा रुग्णालयास अपुरी पडत आहे. या रुग्णालयासाठी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. मात्र या जागेत रुग्णालय सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे परिसरातील तरोडा बु., तरोडा खु. तसेच सांगवी येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी सदरील रुग्णालय नवीन इमारतीत सुरू करून भाह्य रुग्ण विभाग तसेच कोरोणा तपासणी व लसीकरण सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना सूचना केल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी पाहणी केली आहे. या रुग्णालयाचा फायदा तरोडा खु., तरोडा बु. तसेच सांगवी परिसरातील नागरिकांना होणार आहे.

नागरिकांना हे रुग्णालय जवळ पडणार असून वाहतुकीचा खर्च देखील बचत होणार आहे. त्यामुळे हे रुग्णालय नागरिकांच्या सोयीचे होणार आहे. त्यामुळे रुग्णालय तात्काळ सुरू करण्याबाबत आ. बालाजी कल्याणकर यांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत. यावर जिल्हाधिकारी विपीन इटनकर व महानगरपालिका आयुक्त सुनील लहाने यांनी देखील सकारात्मकता दर्शविली असून तात्काळ रुग्णालय सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Total Page Visits: 1183 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top