
नांदेड दि. 15 जून :-आज किनवट तालुक्यातील जावरला येथे प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानास प्रारंभ झाला. या अभियानाचा शुभारंभ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चन्द्रा दोन्तुला यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांच्या हस्ते

शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत बियाणे व इतर विभागाचे विविध प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी शिबिराला उपस्थित असणाऱ्या नागरिकांना मार्गदर्शन केले. या शिबिरास जावरला परिसरातील आदिवासी नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते. तसेच सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रदिप नाईक, नायब
तहसिलदार रामेश्वर मुंडे, सरपंच नमिता गेडाम, माधवराव मरसकोल्हे व इतर विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती. या शिबिराच्या ठिकाणी महसूल, आरोग्य, कृषी, आदिवासी विकास, बांधकाम, पंचायत समिती तसेच इतर शासकीय विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलच्या माध्यमातून आदिवासी नागरिकांना एकाच ठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या.

More Stories
ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइजेशन की पहल से नांदेड के बाबुल गांव मे लेबर कामगारों की घरगुती वस्तु किट अवैध तरीखे से रखने का पर्दा फाश,72 घंटे के बाद भी कामगार उपायुक्त की ओर से पोलिस मे FIR क्यू नही ?
मौलाना मुहम्मद हुजैफा गुलाम वस्तानवी का नांदेड़ दौरा, एडवोकेट कासिम वसीम बाबू सेठ के कार्यालय में जोरदार स्वागत.!
नांदेड येथील प्रसिद्ध समाजसेवक अनवर अहेमद यांची शिवसेना अल्पसंख्यांक विभागाच्या नांदेड जिल्हाप्रमुख पदी निवड