
NANDED TODAY:17,Feb,2021 नायगाव प्रतिनिधी : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विविध योजनेची माहीती सर्व जनतेला व्हावी म्हणून एसबीआय व क्षेत्रीय कार्यालय नांदेड यांच्या वतीने दिनांक २६ फेब्रुवारी २०२१ रोजी आदित्य मंगल कार्यालय मौजे नरसी येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ‘चावडी मेळावा’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती एसबीआय चे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री उमेश डाखे सर व मुख्य शाखा व्यवस्थापक श्री रविकुमार सर यांनी दैनिक केसरी शी बोलताना दिली यावेळी नरसी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील भिलवंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. एसबीआयच्या वतीने सलग दुसऱ्यांदा मौजे नरसी येथे चावडी मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून भारतीय स्टेट बँक शाखा मुदखेड,धर्माबाद आणि देगलूर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम होणार आहे सदर मेळाव्यामधील प्रमुख आकर्षक स्वयं सहायता गट (एस.एच.जी.) यांना लाभ होण्यासाठी कार्यक्रम होणार आहे,सोबतच जवळपास दोनशे स्वयं सहायता गटांना कर्ज पूर्वमंजुर प्रमाणपत्र देण्यात येतील व सदरच्या ठिकाणी बचत गटाचे विविध उत्पादनाचे (स्टॉल) टेबल लावण्यात येईल यासोबतच गृह कर्ज,वाहन कर्ज, व्ययक्तिक कर्ज,इतर कर्ज व अन्य सुविधा बाबतीचे (स्टॉल) टेबल लावण्यात येईल व योजनेची माहिती देण्यात येणार आहे सदर कार्यक्रमाची वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजे पर्यंत रहाणार असून याचा सर्व जनतेनी लाभ घ्यावा असे आवाहन क्षेत्रीय व्यवस्थापक श्री उमेश डाखे सर(एसबीआय आर अँड डी बी क्षेत्र नांदेड) व श्री पी रविकुमार(मुख्य व्यवस्थापक शाखा नांदेड) यांनी केले आहे.