नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदी आ.मोहनअण्णा हंबर्डे सदस्य म्हणून आ.बालाजी कल्याणकर, संतोष पांडागळे, अब्दुल हबीब अब्दुल लतीफ यांच्यासह सहा जणांची नियुक्ती..! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Dialy News > नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदी आ.मोहनअण्णा हंबर्डे सदस्य म्हणून आ.बालाजी कल्याणकर, संतोष पांडागळे, अब्दुल हबीब अब्दुल लतीफ यांच्यासह सहा जणांची नियुक्ती..!

नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदी आ.मोहनअण्णा हंबर्डे सदस्य म्हणून आ.बालाजी कल्याणकर, संतोष पांडागळे, अब्दुल हबीब अब्दुल लतीफ यांच्यासह सहा जणांची नियुक्ती..!

NANDED TODAY:6,Feb,2021 नांदेड-जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण अशोकराव चव्हाण यांच्या शिफारशीनुसार नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय या ठिकाणच्या अभ्यागत मंडळाची घोषणा राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाने नुकतीच केली असून अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदी नांदेड दक्षिणचे आ.मोहन हंबर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सदस्यांमध्ये नांदेड उत्तरचे आ.बालाजी कल्याणकर, दै.सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे यांच्यासह सात जणांचा समावेश आहे.
राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व त्यांना संलग्न असलेल्या रूग्णालयावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाकडून अभ्यागत मंडळाची स्थापना करण्यात येते. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात या मंडळाची पुर्नरचना करण्यात आली असून मंडळाच्या अध्यक्षपदी नांदेड दक्षिणचे आ.मोहनअण्णा हंबर्डे यांची नेमणुक करण्यात आली आहे. तर सदस्य म्हणून नांदेड दक्षिणचे आ.बालाजीराव कल्याणकर, पत्रकार संतोष पांडागळे, अब्दुल हबीब अब्दुल लतीफ, डॉ.करूणा जमदाडे, श्रीमती कल्पना शिरपुरे, दिगांबर पवार, रोहिदास जाधव, कैलास धोत्रे, डॉ.दि.बा.जोशी यांचा समावेश आहे.
अभ्यागत मंडळाची नव्याने स्थापना झाल्यामुळे जिल्हाभरातून डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्याल व रूग्णालयात येणार्‍या रूग्णांना चांगल्या सेवासुविधा पुरविण्यासाठी मोठी मदत होणार आहे. या वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या अभ्यागत मंडळावर नियुक्त केल्याबद्दल अध्यक्षांसह सर्व सदस्यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे आभार मानले आहे. अभ्यागत मंडळावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती मिळाल्यानंतर बोलतांना आ.मोहनअण्णा हंबर्डे म्हणाले की, शासकीय रूग्णालय व महाविद्यालयातील अडीअडचणीची आपणास चांगलीच जाणीव असून या समाजउपयोगी आरोग्य सुविधा पुरविणार्‍या मंडळावर आपली नियुक्ती केल्याबद्दल पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना आपण मनातून धन्यवाद देतो.

Total Page Visits: 366 - Today Page Visits: 2

Leave a Reply

Top