नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटणकर, डॉ.निळकंठ भोसीकर आणि डॉ.बालाजी शिंदे हेच खरे करोना योद्धे- डॉ.हंसराज वैद्य – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटणकर, डॉ.निळकंठ भोसीकर आणि डॉ.बालाजी शिंदे हेच खरे करोना योद्धे- डॉ.हंसराज वैद्य

नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटणकर, डॉ.निळकंठ भोसीकर आणि डॉ.बालाजी शिंदे हेच खरे करोना योद्धे- डॉ.हंसराज वैद्य

Spread the love

NANDED TODAY:03,July,2021 नांदेड,(प्रतिनिधी)-जागतिक डॉक्टर्स डेच्या निमित्त ते कौतूकास पात्र आहेत. आज समस्त डॉ.समूहाचा(डॉक्टरांचा), त्यांनी मनुष्य जीव रक्षणाप्रती केलेल्या उदात्त कार्याचा गौरव करण्याचा, त्यांनी समाजाप्रती केलेल्या कार्याचे ऋण व्यक्त करण्याचा, त्यांनी केलेल्या उदात्त सेवेची समाजानी दखल घेण्याचा, त्यांचा अभार व्यक्त करण्याचा, त्यांचे कौवतुक करण्याचा हा दिवस. वर्ल्ड डॉक्टर डे अर्थात जागतिक डॉक्टर्स दिवस..!

जग भर हा दिवस साजरा केला जात आहे. मित्रांनो,जसे देशाच्या सिमेवर सिमा रक्षण करणारे तैनात जवान (सीमा रक्षक, सैनिक),समाज रक्षणासाठी असलेले पोलिस दल रात्रंदिवस देशाचे व समाजाचे, स्वतःचा प्राण धोक्यात घालून रक्षण करतात आणि आपण त्यांच्यामुळे आपल्या कुटूंबिया समवेत सुखिची शांत पणे झोप घेतो, तद्वतच या डॉक्टर समुदायाचे आहे.

ते आहेत म्हणून आज संपूर्ण समाज सुखी,समाधानी, आनंदी,आणि व्याधी व त्रासमुक्त तथा सुखी आहे..!

मित्रांनो आपण जर सद्याचा करोना महामारीचा काळ लक्ष्यात घेतला तर तर डॉक्टरांच्या उदात्त कार्याची जाणीव होण्यास पुरे आहे.या महामारीच्या काळात सर्व समाज बांधव आपल्या कुटूंबात सुरक्षित राहिला व डॉक्टर समूह मात्र समाज रक्षणा साठी घरावर तुळशी पत्र ठेवून,स्वतःचा जीव धोक्यात घालून अहोरात्र करोनाशी झुंज देत राहिला..!

या मानव सेवेत एकट्या भारत देशातील जवळ जवळ दिड हजार डॉक्टर्सनी आपला प्राण गमावला.एक एम.बी.बी.एस.डॉक्टर तयार होण्यासाठी तिस वर्षाचा काळ व कोट्ट्यावधीचा खर्चयेतो. माझ्या प्राण प्रिय अप्तांचे, माझे जर कांही बरे वाईट झाले तर?त्यांचे कसे होईल ? याची कसलीच चिंता न करता, ती समाज बांधवावर सोडून, समाज बांधवाचे रक्षण करण्याच्या उदात्त हेतुने त्यांनी मृत्यूला हसत हसत कवटाळले ! करोडो लोकांनां जीवन दान दिले.!

डॉक्टर्स नसते तर या समाजाचे काय झाले असते? याचा फक्त विचार केला तरी पुरे आहे..! तेंव्हा तमाम डॉक्टर्स समुहा विषयी आपण आज ऋण व्यक्त करूयात.जे गेले आहेत त्यांच्या आत्म्यास सद्गति मिळो असी मनोकामना ईश्वर चरणी व्यक्त करूयात !

मित्रांनो, आजच्या दिवसाचे औचित्त साधून नांदेड जिल्ह्याचे खरे करोना यौध्ये,ज्यांनी अत्यंत कमी वेळात महाराष्ट्रात नांदेडचे नांव करणारे असे जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटणकर, त्यांचे सहकारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर, आणि जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.बालाजी शिंदे या त्रिमूर्तिंचे विशेष ऋण व्यक्त करू यात,

अभार माणू यात. कारण आख्या महाराष्ट्रात फक्त नांदेड जिल्ह्यातच काल एकहि करोना रूग्ण मिळून आला नाही..!याचे सर्व श्रेय या तिघानांच जाते.त्यांनी उत्कृष्ठ नियोजन,चिकाटी, अहोरात्र धडपड करून ’आज नांदेड जिल्हा करोना मुक्त केलाय..!’ खरच ही बाब आपणा सर्वांसाठी भूषणावह आहे.आनंद दायी व दिलासा देणारी आहे..!

म्हणून त्यांचे समस्त नांदेड वाशियांच्या वतिने आपण अभार माणूयात. त्यांचे ऋण व्यक्त करूयात. त्यांच्या या कार्याची दखल घेवून त्यांचा शब्द सुमनानी गौरव करूयात. त्यांना धन्यवाद देवूयात..!

Total Page Visits: 813 - Today Page Visits: 2

Spread the love

Leave a Reply

Top