
NANDED TODAY: 10,Feb,2022 नांदेड : नांदेड जिल्ह्यात मोठा उद्योग उभारण्यात यावा यासाठी जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा सातत्याने प्रयत्न सुरू असतो .अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी जिल्ह्यात मोठा उद्योग उभारण्यात यावा याकडे लोकसभा सभागृहाचे लक्ष वेधले आहे

जिल्ह्यात मोठा उद्योग उभारणी साठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधले.नांदेड हे उद्योगासाठी परिपूर्ण शहर
असून त्यासाठी आवश्यक असलेली साधन सामुग्री उपलब्ध आहे. या भागातील रोजगार निर्मिती साठी मोठा उद्योग
उभारणे गरजेचे आहे .या भागात मोठं मोठं नेते होऊन गेले .पण अद्यापही औद्योगिक क्षेत्र या भागात निर्माण झाले नाही .
येथील नागरिकांना रोजगारा साठी अन्यत्र जाण्याची गरज भासू नये. याकरिता मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती ची
गरज म्हणून उद्योग उभारणी व्हायला पाहिजे

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून मोठा एखादा कारखाना उभा करावा यासाठी मागणी केली आहे.नांदेड च्या विकासात महत्वाची भूमिका बजवात खा
प्रतापराव पाटील यांनी रेल्वे मार्गासाठी रेल्वे मंत्री मंत्री यांची सकाळी भेट घेतली त्यात रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तर लोकसभेत त्यांनी नांदेड मध्ये

मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती साठी एखादा उद्योग उभारण्यासाठी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे येत्या काळात निश्चितच खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा उद्योग उभारणीसाठी प्रयत्न सुरू राहणार आहेत.