
NANDED TODAY:12,July,2021 ( Naeem Khan ) नांदेड महानगरपालिकेच्या आगामी २०२२ च्या निवडणूक अनुषंगाने शहर राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी राष्ट्रवादी पार्टी कार्यालय नांदेड येथे महत्पूर्ण बैठक घेऊन मोर्चेबांधणी सुरु केली आहे!
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुनील कदम यांच्या आध्यक्षतेखाली कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची महत्पूर्ण बैठक पार पडली.

पक्षाची बांधणी नव्याने करीत शहरातील प्रत्योक वार्डात शेवटच्या मतदारापर्यंत पोहचून लोकांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या .

तसेच बूथ कमिटया, प्रभाग समित्यांची नव्याने रचना करून त्यांच्यावर प्रभागातील मतदारांपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांची नवीन फळी निर्माण करण्याचे ठरविण्यात आले.

आगामी मनपा निवडणुकीसाठी पक्षात काम करणाऱ्यांनाच संधी दिली जाईल.
वार्डवार्डात जावून बैठका घेणे, मतदारांशी संपर्क वाढणे व पक्षाची ध्येयधोरणे शेवटच्या मतदारापर्यंत पोहचवणे आदी सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीच्या अनुषंगाने शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नव्याने नवचेतन्य निर्माण होवून आगामी होणाऱ्या २०२२ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपले चांगले प्रदर्शन करेल, असा विश्वास डॉ सुनील कदम यांनी व्यक्त केला!
यावेळी सौ. कल्पनाताई डोंगळीकर, गजानन कल्याणकर, सिंधुताई देशमुख, रऊफ जमीनदार, धनंजय सूयवंशी, गंगाधर कावडे, तात्याराव पाटील, बंटी लांडगे, गणेश तादलापूरकर, सय्यद मौला, प्रकाश मुराळकर, शफीउर रहेमान, युनूस खान,
भीमराव श्रीसागार, नितीन मामडी, साईदा पटेल, पशाखान तांबोळी, प्रकाश घोगरे,पत्रकार नईम खान, राजू कल्याणकर, शेख महंमदी, कन्होया कदम, गोविंद यादव, श्रीधर नागपूरकर, राहुल जाधव, वर्षा फुलपगार,
पत्रकार मोहमद दानिश,प्रेमजीत कौर कोल्हापुरे, मोहसीन खान पठाण, नागमनी चलवदे, रेणुका गावंडे, लक्ष्मणराव भवरे, रोसिया सय्यद, जिल्हानी पटेल, फैजल सिद्दीकि, प्रसाद पवार, चांदोजी सूर्यवंशी, एम डी सैराब, मतीन बेग,
सर्जितसिंघ, महेंद्र भटलाडे, माधव चिंचाळे, बाबूसिंघ राठोड, राजू गायकवाड, गजानन लिंबे, बाळू गौर शंकर साखरे, संजय गुंडाळे, मारोती चिवळीकर, दिलीपसिंह ठाकूर,अविनाश चौधरी,विशंभर पवार, शंकर पाटील, निखिल नाईक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्यने उपस्थित होते