नाळेश्वर परिसरातील 18 गावातील प्रवाशांच्या सुविधेसाठी गेल्या वीस वर्षापासून धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्यातर्फे चालविण्यात येणाऱ्या लोकनेते कै. गोपीनाथराव मुंडे पाणपोईचे उद्घाटन! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > नाळेश्वर परिसरातील 18 गावातील प्रवाशांच्या सुविधेसाठी गेल्या वीस वर्षापासून धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्यातर्फे चालविण्यात येणाऱ्या लोकनेते कै. गोपीनाथराव मुंडे पाणपोईचे उद्घाटन!

नाळेश्वर परिसरातील 18 गावातील प्रवाशांच्या सुविधेसाठी गेल्या वीस वर्षापासून धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्यातर्फे चालविण्यात येणाऱ्या लोकनेते कै. गोपीनाथराव मुंडे पाणपोईचे उद्घाटन!

Spread the love

भाजपा मराठवाडा संघटन मंत्री संजय कोडगे यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या अध्यक्षतेखाली मिलरोड नांदेड परिसरात संपन्न झाल्यानंतर नागरिकांना फळे वाटप करण्यात आले.

NANDED TODAY: 23,April,2022 शिवशक्तीनगर नांदेड परिसरात ग्रामीण भागातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने ये जा करीत असतात. मिल रोड हा रस्ता कायम वर्दळीचा असतो.

उन्हाळ्यात नागरिकांना थंड पाणी मिळावे या उद्देशाने भाजपा जिल्हा सरचिटणीस दिलीप ठाकूर हे गेल्या वीस वर्षापासून दरवर्षी पानपोई सुरू करून सुविधा देतात. संजय कोडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावर्षी पाणपोईचे उद्घाटन एका समारंभात करण्यात आले.

याप्रसंगी व्यासपीठावर भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळू खोमणे, जिल्हा संघटन सरचिटणीस विजय गंभीरे, प्रतिष्ठित व्यापारी सतीश शर्मा, जिल्हा उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी, जिल्हा चिटणीस मनोज जाधव, सोशल मीडिया जिल्हा संयोजक राज यादव,

रेल्वे पार्सल कामगार युनियनचे अध्यक्ष गोपाळराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला कोडगे व साले यांच्या हस्ते पानपोई चे पूजन करण्यात आले. केक कापून संजय कोडगे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अरुणकुमार काबरा, रोहित पाटील, बिरबल यादव,

महेश बनसोडे, किशनराव पालवेकर, रामराव भोसले, राजेश यादव, सविता काबरा, किशन राठोड यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा शिरोपाव व मोत्याची माळ देऊन सत्कार करण्यात आला. संयोजक दिलीप ठाकूर यांनी प्रास्ताविक करताना पानपोई सुरू करण्यामागची भूमिका स्पष्ट केली.

प्रवीण साले यांनी आपल्या भाषणातून उन्हाळ्यात नागरिकांना थंड पाणी पाजण्यासारखे दुसरे पुण्य नाही. तसेच भाजपच्या प्रत्येक सेवाकार्यात दिलीपभाऊ ठाकूर यांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन केले. सत्काराला उत्तर देताना संजय कोडगे यांनी एक चांगला कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. गोपालसिंग ठाकूर हे

आपल्या घरासमोर जनावरांसाठी बारमाही पाणी उपलब्ध करून देत असल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेशसिंह ठाकूर तर आभार प्रदर्शन कपिल यादव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष भारती, राहुल बनसोडे, सचिन उत्तरवार,

जावेद पठाण, किशोर लोंढे, मोहम्मद जावेद, सुभाष पावडे, पंढरीनाथ सुगावकर, उज्वलकुमार पालेकर, विद्यासागर निलावार, माधव बेजरमवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम संपल्यानंतर परिसरातील सर्व

नागरिकांना फळे वाटप करण्यात आली. गेल्या वीस वर्षापासून उन्हाळ्यात थंड पाण्याची व्यवस्था करीत असल्याबद्दल दिलीप ठाकूर यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Total Page Visits: 2707 - Today Page Visits: 2

Spread the love

Leave a Reply

Top