पत्रकारिता पुरस्काराचा सोमवारी औरंगाबादला प्रदान सोहळा ..! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Dialy News > पत्रकारिता पुरस्काराचा सोमवारी औरंगाबादला प्रदान सोहळा ..!

पत्रकारिता पुरस्काराचा सोमवारी औरंगाबादला प्रदान सोहळा ..!

NANDED TODAY:14,Feb,2021 नांदेड,(प्रतिनिधी)-पत्रकार दिनानिमित्त मागील तेरा वर्षापासून देण्यात येणारा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ नांदेडचा पत्रकारिता पुरस्कार प्रदान सोहळा दि.15 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई विभागीय कार्यालय, आंजल अपार्टमेंट, गजानन महाराज चौक, औरंगाबाद येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
मीमांसा फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, पत्रकार प्रेस परिषद, समीक्षा, ह्युमन राईट्स फाऊंडेशन व मंथन क्रिएटिव्ह ग्रुपच्यावतीने दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येतो. पुरस्काराचे तेरावे वर्ष आहे. सदरील पुरस्कार औरंगाबाद येथे संपन्न होणार असून मराठवाडा विभागाचे माहिती संचालक डॉ.गणेश रामदासी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून हैद्राबाद येथील हिंदी प्रचार सभेचे परिक्षामंत्री प्रा.सुरेश पूरी व पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांची उपस्थिती लाभणार आहे.
मागील 15 पेक्षा अधिक वर्षापासून वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत असताना दहा वर्षापेक्षा अधिक काळ नवाकाळ दैनिकात सेवा देणारे आणि नवाकाळचे संपादक निळकंठ खाडीलकर यांच्या अग्रलेखावर डॉक्टरेट मिळवणारे डॉ.प्रभू गोरे यांचा डॉ.शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार तर मागील 25 वर्षापेक्षा अधिक काळापासून महाराष्ट्र टाईम्स, लोकपत्र, दिव्य मराठी या सारख्या दैनिकात सेवा देणारे दै.पुढारीचे धनंजय लांबे यांचा कै.सुधाकरराव डोईफोडे प्रेरणादायी पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कृष्णूरसारखा मोठा धान्य घोटाळा उघडकीस आणून भ्रष्टाचाराविरूद्ध सतत लढा उभारणारे नांदेड चौफेरचे संपादक मोहम्मद आरेफ खान यांना समीक्षा कर्तृत्व सन्मान देऊन गौरव करण्यात येणार असून स्व.रामेश्वर बियाणी जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार दै.सत्यप्रभाचे गोपाळ देशपांडे, लातूरच्या युवा छत्रपतीचे संपादक वैजनाथ देशमुख यांना स्व.अनिल कोकीळ सामाजीक पत्रकारिता पुरस्कार, ग्रामीण भागात लेखणीतून अन्यायाला वाचा फोडणारे कंधारचे दिगंबर गायकवाड यांना डॉ.शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार, वृत्तपत्र क्षेत्रासहीत राजकारणात सक्रिय झालेले नगरसेवक तथा संपादक मुन्तजीबोद्दीन मुनीरोद्दीन यांना स्व.मिर्झा अहेमद अली बेग चुखताई पत्रकारिता पुरस्कार, सातत्याने  भ्रष्टाचारावर प्रहार करणारे दै.आनंदनगरीचे बजरंग शुक्ला यांना पंचनामाकार लक्ष्मणराव गायकवाड निर्भीड पत्रकारिता पुरस्कार, स्व.अनंतराव नागापूरकर वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार शहरातून चंद्रकांत घाटोळ, ग्रामीण भागातून माहूरचे तुळशीराम ठाकरे, मीमांसा फाऊंडेशन ह्युमन राईट्स पुरस्कार शकिलउर रहेमान, वृत्तपत्र क्षेत्रातील जाहिरातीचा आधारस्तंभ दै.एकजुटचे सुनिल मुळे, वृत्तपत्र क्षेत्रातील सहकारी दुवा संगणक चालक राज आडसकर, वृत्तपत्र क्षेत्रातील तिसरा डोळा फोटोग्राफर सिडकोचे सारंग नेरलकर, स्व.माधव अंबुलगेकर युवा पत्रकारिता पुरस्कार नांदेड टुडेचे नईम खान तर स्व.सुरेश पटणे मुद्रण सेवा पुरस्कार सुनिल शिंदे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
सदरील पुरस्कार प्रदान सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंथन क्रिएटिव्ह ग्रुपचे रामेश्वर धुमाळ, पत्रकार प्रेस परिषदेचे प्रदेश प्रभारी अरविंद जाधव, मराठवाडा अध्यक्ष सखाराम कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश पांडे, माजी अध्यक्ष सुनिल कुलकर्णी, माजी अध्यक्ष गणेश जोशी, कार्याध्यक्ष विश्वास गुंडावार, सहसचिव रविंद्रसिंघ मोदी, महानगराध्यक्ष रविंद्र कुलकर्णी, नांदेड दक्षीणचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील, उपाध्यक्ष ज्ञानोबा पवार तथा संपादक रूपेश पाडमुख यांनी केले आहे.

Total Page Visits: 188 - Today Page Visits: 1

Leave a Reply

Top