
NANDED TODAY: 23,Jan,2022 नांदेड : लोहा तालुक्यातही मागील पाच वर्षांपासून अभिनेता अमिरखान यांच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा अंतर्गत लोहा तालुक्यात पाणीदार गाव चळवळ उभी करण्यासाठी प्राणिताताई देवरे -चिखलीकर यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
पानी फाउंडेशनचे मराठवाडा समन्वयक संतोष शिनगारे यांच्या उपस्थितीत वडेपुरी, गुंडेगाव, शेलगाव येथे ग्रामस्थांच्या बैठका घेण्यात आल्या व समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. पानीदार गावासाठी प्राणिताताई यांनी सुरू केलेली चळवळ जल सिचन क्षेत्रात वाढ व शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटी उचवणारी ठरते आहे.

पाच वर्षां पासून लोहा तालुक्यातील निवड झालेल्या गावात अभिनेता अमीर खान यांच्या पानी फाउंडेशनच्यावतीने सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा घेतली जात आहे.तालुक्यात तत्कालीन आ.प्रतापराव पाटील चिखलीकर,
तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, सौ डोंगरे यासह अनेक मान्यवर, अधिकारी कर्मचारी श्री व सौ.भोसीकर, विश्वांबर मंगनाले, तहसीलदार आंबेकर , तहसीलदार अरुणा संगेवार ,यासह ग्रामस्थांनी श्रमदान केले ,जळचळवळी साठी प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी सातत्याने तन -मन- धनाने त्या त्या गावांना प्रत्साहन दिले आहे.

गावोगावी लोकां मध्ये पाण्याचे महत्व समजू लागल्याने अनेक गावातून श्रमदान व लोकचळवळ उभी राहिली त्याचा परिणाम त्या त्या गावात पाणी पातळी वाढली. सिचन वाढले यात प्राणिताताई यांचे योगदान मोठे आहे.
दुसऱ्यांदा कोरोना संसर्गावर मात करून सामाजिक कार्यात प्राणिताताई पुन्हा सक्रिय झाल्या वडेपुरी येथे पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित समृद्ध गाव स्पर्धेच्या अनुषंगाने आढावा बैठकीत पाणी फाउंडेशनचे मराठवाडा समन्वय संतोष शिनगारे, प्राणिताताई यांनी
मार्गदर्शन केले लोहा पंचायत समितीचे सभापती आनंदराव पाटील शिंदे, उपसभापती नरेंद्र गायकवाड, माजी उपसभापती रोहित माजी उपसभापती लक्ष्मणराव बोडके, मामीडवार गुरुजी, पाणी फाउंडेशनचे राजाभाऊ कदम यांच्यासह वडेपुरी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा मोजे गुंडेवाडी येथे या टीमने ग्रामस्थांना मार्गदर्शन केल सरपंच दिगबर गुंडे उपसरपंच संभाजी गुंडे तंटामुक्ती अध्यक्ष विक्रम चनापूरे व सर्व गावकरी मंडळी हजर होते.
शेलगाव धानोरा येथे प्राणिताताई देवरे चिखलीकर पाणी फाऊंडेशन चे मराठवाडा समनवय संतोष शिनगारे यांनी पाण्याचे महत्व समजावून सांगीतले आजूबाजूच्या गावांची कहाणी सांगितली उपसभापती नरेंद्र गायकवाड,

माजी उपसभापती रोहित पाटील आंडगेकर, कृउबा समिती संचालक अंकुश पाटील कदम, सरपंच व चेअरमन मारोतराव पाटील कदम, उपसरपंच रामेश्वर पाटील कदम, प्रल्हाद पाटील एकनाथ पाटील व सर्व गावकरी उपस्थित होते.