पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर वेळीच सावध व्हा: डॉ.हंसराज वैद्य नांदेड – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर वेळीच सावध व्हा: डॉ.हंसराज वैद्य नांदेड

पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर वेळीच सावध व्हा: डॉ.हंसराज वैद्य नांदेड

Spread the love

NANDED TODAY:24,Nov,2021 नांदेड,(प्रतिनिधी)-आज घडीला प्रगत राष्ट्रांची कोरोना महामारीने केलेली भयावह परिस्थिती लक्षात घेता भारतासारख्या देशाला व जनतेला ती न परवडणारी आहे. भारतातील कोरोना संसर्गाची आकडेवारी पाहिली तर कोरोना संसर्ग अजुन पूर्णतः संपलेला नाहीच उलट वाढतो आहे

असे चित्र दिसते. पुढील 2-3 महिने कोरोना संसर्गाला पोषक असे वातावरण आहे.भारतातील लोकसंख्येची घनता,येथील चालीरिती, परंपरा, उत्सव प्रियता, गरिबी, अज्ञान, अंधःश्रद्धा, जनतेची रोगप्रतिबंधक लसीकरणा

विषयाची कमालीची उदासिनता या सर्व गोष्टी कोरोना संसर्ग वाढीला अत्यंत पोषक बाबी आहेत. भारतामध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झालेले होते. काही राज्यांनी बर्याच जिल्ह्यात कोरोना मुक्तीची घोषणा पण

केलेली होती. त्यामुळे आपण उत्सवप्रिय पुढारी व जनता बेभानपणे लग्न सोहळे, मुंजी, शाल-अंगठी, डोहाळे जेवन, अनेक प्रासंगिक कार्यक्रम ,सभा,मोर्चेधर्ने,जन्मोत्सव व सनादी कार्यक्रम बिंधास्तपणे गर्दी करून

साजरे करत सुटलो आहोत असेच चित्र पाहवयास मिळत आहे. कोरोनाची जागतिक आकडेवारी गेल्या सव्हा महिन्यामध्ये सातत्याने वाढतच असल्याचे दिसते आहे.

15ऑक्टो.457808, 22ऑक्टो. 485649, 29ऑक्टो.504829, 5 नोव्हें.515315, 12 नोव्हें.594390, 19 नोव्हें. 659373 यामुळेच त्या त्या देशातील कांही शहरामध्ये पुन्हा लॉक डॉऊन घोषित केलेजात आहे.

भारतामध्ये केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, प.बंगाल आणि उत्तरप्रदेशची आकडेवारी पाहता पं.बंगाल वगळता कोरोना संसर्ग सातत्याने कमी जास्त होत असताना दिसत आहे.

प.बंगालमध्ये- 7 ऑक्टोबरला 643, 21 ऑक्टोबरला 833, 4 नोव्हेंबरला 918 व 18 नोव्हेंबरला 860 केसेस आढळून आल्या आहेत. यावरून देशातील कोरोना संकट पूर्णपणे टळलेले नाही हे उघडसत्य आहे. म्हणून भारतातील व महाराष्ट्र राज्यातील सर्व जनतेने अतिदक्ष राहणेच उचित राहणार आहे.

जगात सर्व प्रथम कोरोना प्रतिबंधक लस भारतात यार झाली. जगात भारत देश हे पहिले राष्ट्र आहे की इथे प्रत्येक नागरिकाला कोरोना प्रतिबंधक लस विनामुल्य दिली जात आहे. पण आपण भारतीय.! लसीकरण करून घेण्यास

अत्यंत उदासिन आहोत. केंद्र व राज्य शासन कोरोना महामारीची तिसरी लाट येऊ नये म्हणून टाहो फोडून जनजागृती करण्याची पराकाष्टा करत आहेत.पण आपण कोरोना संसर्गाबाबद किती मोठी किंमत देऊनही तेवढे गंभीर आहोत का? नाहित.!

मित्रांनो, या महामारीत केवढे बलाढ्य तथा नामांकित रत्न आणि आप्त आपण गमाऊन बसलो आहोत?हे आपण थोडं आठवा.! आणि आता परत जर जिवित, आर्थिक मानसिक तथा भावनिक हानी टाळावयाची असेल तर आपणास पंचसुत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.नव्हे ते क्रम प्राप्तच आहे.!

1.प्रथम सर्वांनीच कुटूंबात शंभरटक्के कोरोना रोग प्रतिबंधक लसीकरण करून घ्या. 2. प्रत्येकानी मास्क वापरा. 3.सॅनिटायझरचा वापर सदोदित करा. 4. सामाजिक अंतराचे पथ्य राखा. 5. शासनानी व प्रशासनानी घालून दिलेले सर्व निर्बंध काटेकोरपणे पाळा. आणि त्यांना सहकार्य करा.

माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे आचरणात आचरणात आणा. घाबरू नका, सतर्क रहा, सजग रहा,अफवावर विश्वास ठेऊ नका, सकारात्मकतेने वागा, एकमेकाला घेऊन चला, सहकार्य करा. स्वतः होऊन निर्भिडपणे त्वरित

वैद्यकीय तपासणी करून वेळीच उपचार हेही करा. यामुळे भारतात संभाव्य तिसरी लाट तथा पुन्हा लॉकडाऊनची वेळ सहज टाळता येईल असे डॉ.हंसराज वैद्य यांनी सर्व जनतेला कळकळीचे आवाहान केले आहे.

Total Page Visits: 492 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top