प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नांदेड दौर्यावर राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात सहभाग नोंदवा : हरिहरराव भोसीकर – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नांदेड दौर्यावर राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात सहभाग नोंदवा : हरिहरराव भोसीकर

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नांदेड दौर्यावर राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात सहभाग नोंदवा : हरिहरराव भोसीकर

Spread the love

NANDED TODAY:24,June,2021 नांदेड/प्रतिनिधी राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमानिमित्त राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नांदेड जिल्ह्याच्या दौर्‍यावर दि. 26, 27, 28 जून रोजी येत असून आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यांनी तसेच सर्व तालुकाध्यक्षांनी सहभाग नोंदवावा असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी सांगितले.

राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे नांदेड जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असल्याच्या अनुषंगाने दि. 24 जून रोजी नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. यावेळी हरिहरराव भोसीकर बोलत होते.

ते म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे दि. 26 जून रोजी दुपारी 2.30 वाजता अहमदपूर येथून 3.30 वाजता लोहा जि. नांदेड येथे त्यांचे आगमन होणार आहे. 3.30 ते 4.15 लोहा विधानसभा मतदार संघाचा व्यंकटेश मंगल कार्यालय लोहा येथे आढावा घेणार आहेत.

4.15 वाजता नांदेडकडे प्रयाण, 5.00 वाजता नांदेड येथे आगमन, 5 ते 6 या वेळेत नांदेड जिल्हा जलसंपदा अधिकार्‍यांची बैठक, नांदेड येथे मुक्काम. दि. 27 जून रोजी रविवार सकाळी 9 ते 9.30 या वेळेत जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या निवासस्थानी, 9.30 ते 10.15 एमजीएम महाविद्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेला उपस्थिती,

10.15 ते 10.45 या वेळेत एमजीएम महाविद्यालय येथे नांदेड शहर जिल्हा कार्यकारिणीची बैठक, 10.45 ते 11.15 नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघ आढावा बैठक, 11.15 ते 11.45 नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघ आढावा बैठक, 11.45 ते 12.30 नांदेड ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीची एमजीएम महाविद्यालय येथे बैठक, 12.30 ते 1.15 नायगाव विधानसभा मतदार संघ आढावा बैठक, 1.15 ते 2.00 देगलूर विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक,

2.00 ते 2.45 राखीव, 2.45 ते 3.30 मुखेड विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक, 3.30 ते 4.15 भोकर विधानसभा मतदार संघाचा आढावा, 4.15 वाजता नांदेड येथून हदगावकडे प्रयाण, 5.45 हदगाव येथे आगमन, 5.45 ते 6.30 हदगाव विधानसभा मतदार संघाचा संत रोहिदास सभागृह नगरपालिका हदगाव येथे आढावा,

6.30 वाजता माहूरकडे प्रयाण, 8.00 माहूर येथे आगमन व मुक्काम, दि. 28 जून रोजी सकाळी 9 ते 10 या वेळेत शासकीय विश्रामगृह माहूर येथे किनवट विधानसभा मतदार संघाचा आढावा, 10 वाजता माहूर येथून उमरखेड जि. यवतमाळकडे प्रयाण.
या कार्यक्रमाला पदाधिकार्‍यांनी, सर्व तालुकाध्यक्षांनी उपस्थित रहावे,

तसेच शासनाने ठरवून दिलेल्या कोवीड-19 नियमांचे सर्वांनी पालन करावे, सोशल डिस्टन्स, मास्क वापरावे असे नांदेड जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी केले आहे. या बैठकीला पक्षातील जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Total Page Visits: 951 - Today Page Visits: 2

Spread the love

Leave a Reply

Top