
NANDED TODAY:30,Sep,2021 अविनाश पठाडे,माहूर (नांदेड) : तालुक्यातील सामाजिक, माध्यम क्षेत्रातील कार्यकर्ते तथा अंजनखेड येथील सावित्रीमाई फुले उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रा.विनोद कांबळे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या संस्थेच्या वतीने
राज्यस्तरीय गुणीजन गौरव महापरिषद पुरस्कार 2021 अंतर्गत “गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला. याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष ऍड. कृष्णा जगदाळे, प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध कीर्तनकार केशव महाराज, श्रीमती जोशी, श्रीमती शिंदे यांच्या उपस्थितीत रविवार (दि. 26 सप्टेंबर ) रोजी ऑनलाइन पुरस्कार प्रदान करण्यात आला .
महाराष्ट्र राज्यातुन विविध क्षेत्रातून पुरस्कारासाठी निवडलेल्या व्यक्तींना या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. माहूर तालुक्यातील सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालय अंजनखेड येथील उच्च माध्यमिक विभाग प्रमुख
प्रा.विनोद यादवराव कांबळे यांना मानाचा फेटा ,मानकरी बॅच,महावस्त्र, गौरव पदक ,सन्मानचिन्ह व मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलाते आदिवासी डोंगरी भागात विद्यार्थ्यांचा गुणात्मक संख्यात्मक व

सर्वांगीण विकास होण्यासाठी 15 वर्षापासून अविरत मराठी व इतिहास विषयाचे अध्यापन कार्य करीत आहेत . याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबवुन त्यांची गुणवत्ता वाढीसाठीचे प्रयत्न ते सातत्याने करत असतात.
या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वी त्यांना महात्मा फुले शिक्षक परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार ,काव्य पुरस्कार ,कला, नृत्य, कथालेखन एकांकिका ,दिग्दर्शन ,अभिनय , सूत्रसंचालन, अशा विविध
क्षेत्रात राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत .माध्यम क्षेत्रातही बहुजन आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी म्हणुन त्यांनीआपली छाप निर्माण केली आहे. न्याय प्राधिकरण सेवा सदस्य ,ग्राहक संरक्षण संघटना जिल्हाध्यक्ष ,अशा अनेक
सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक संघटनेतुन त्यांनी योगदान दिले आहे .कोरोना काळात विद्यार्थ्यासाठी यूट्यूब चॅनल ,ऑनलाइन शिक्षण ,विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे कार्य अविरतपणे ते करत आहेत .
या पुरस्काराने आणखी समाजहिताचे कार्य करण्याची जबाबदारी वाढल्याचे सांगितले आहे. या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले याचे श्रेय आपली अर्धांगिनी प्रिया कांबळे, भाऊ, बहीण,भाऊजी, आई आणि परिवार यांना दिले आहे. तसेच
या सर्वांचे योगदान, आणि प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले .त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा विमलताई खराटे,संस्था सचिव मा. जि. परिषद सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य ज्योतिबा खराटे यांनी अभिनंदन केले.
याचबरोबर शाळेच्या श्रीमती प्राचार्य जयस्वाल , पर्यवेक्षक एन .एम .राठोड, प्रा.डाॅ.राजेद्र लोणे , नगरसेवक दीपक कांबळे ,निरधारी जाधव, ,पुरोगामी शिक्षक संटना अध्यक्ष एस. एस. पाटील,प्रविण वाघमारे, प्रकाश गायकवाड,मनोज किर्तने,
मिलिंद कंधारे, प्रा. वैजनाथ जाधव, प्रा.सुंकावार,प्रा. सूर्यवंशी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पावर ऑफ मीडिया चे सर्व पदाधिकारी माहूर, पत्रकारीता सेवा संघ किनवट ,बहुजन आवाज न्युज संपादक विजयकुमार लोंढे, शिक्षक संघटना
सामाजिक संघटना ,राजकीय नेते मंडळीनी त्यांचे कौतुक केले आहे.