बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ” शिवधाराचा ” उगम -राजश्री पाटील ; ग्राहकांना ७ टक्के लाभांशाची भेट – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Uncategorized > बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ” शिवधाराचा ” उगम -राजश्री पाटील ; ग्राहकांना ७ टक्के लाभांशाची भेट

बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ” शिवधाराचा ” उगम -राजश्री पाटील ; ग्राहकांना ७ टक्के लाभांशाची भेट

Spread the love

नांदेड: 1,Feb,2021  महिलांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळावे,त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना अर्थसाक्षर करण्यासाठी शिवधाराची स्थापना झाली आहे. कोरोनाच्या काळात देशातील राज्यातील मोठ्या संस्था डबघाईला आलेल्या असताना शिवधाराने मोठ्या जिद्दीने कार्य करून ग्राहकांना सेवा देण्याचे काम केले आहे.त्यामुळेच ग्राहकांना यंदाच्या आर्थिक वर्षात आम्ही ७ टक्के लाभांश भेट देत आहोत असे प्रतिपादन शिवधारा महिला नागरी संस्थेच्या आमसभेनिमित्त राजश्री पाटील यांनी केले आहे.

           शिवधारा महिला नागरी पतसंस्थेची ९ वी वार्षिक सर्वसाधारण  सभा आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या परिसरात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा राजश्री पाटील,उपाध्यक्ष कीर्ती तगडपल्लेवार ,तज्ञ संचालक धनंजय तांबेकर,सचिव नीता कटकमवार,अरुणाताई पुंड,सुचिता उखळकर ,सुरेखा जाधव,प्रतिक्षा पतंगे , सविता  मामीलवाड,गोदावरी अर्बनच्या उपाध्यक्ष हेमलता देसले, संचालक साहेबराव मामीलवाड,मुख्य व्यवस्थापक सुरेखा दवे,अंकेक्षक तुकाराम राठोड यांच्यासह ग्राहक ,ठेवीदार, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी संस्थेच्या वतीने उत्कृष्ट ठेवीदार सरोज आंबेकर,रत्नमाला अशोक,मनिषा देशमुख,उत्कृष्ट लोणधारक झाकेर अहमद, अब्दुल वाजीद,बालाजी राजेवार,उत्कृष्ट दैनिक ठेवप्रतिनिधी म्हणून जलील अहमद, ज्ञानदेव कदम तर उत्कृष्ट बचतगट म्हणून पार्वती महिला बचतगट यांचा ट्राफी देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. पुढे बोलतांना राजश्री पाटील म्हणाल्या की, बचतगटाच्या माध्यमातून सुरवात झालेली शिवधारा आता हळूहळू वाटचाल करीत असली तरी येणाऱ्या काळात तिचे  वटवृक्षात रूपांतर झालेले असेल असा माझा ठाम विश्वास आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर भाषणात संस्थेचे तज्ञ संचालक धनंजय तांबेकर म्हणाले कि,महिलांना केवळ शिक्षण आणि स्वातंत्र देऊन  चालणार नाही तर , त्यांना काळाच्या सोबत अर्थ सक्षम सुद्धा केले पाहिजे, बचत गटाच्या माध्यमातून महिलांना कर्ज वाटप करून  लघु उद्योग उभारणीस हातभार लावण्याचे काम शिवधाराने केले आहे व यापुढेही कायम करणार आहे. ग्राहकांच्या विश्वास आणि संचालक मंडळाच्या भक्कम सोबतीमुळे व कर्मचाऱ्यांच्या तत्पर सेवेमुळे शिवधाराला शासनचा अ दर्जा प्राप्त झाला आहे.याच गतीने वाटचाल सुरु राहिल्यास आगामी काळात शिवधारा यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहचेल यात दुमत नाही.यावेळी मोठ्या संख्येने सभासद ,व्यवस्थापक आनंद संगावार , व्यवस्थापक विजय शिरमेवार ,,शाखा अधिकारी गणेश येरकले,अक्षय ढवळे,स्मिता तुंगेनवार,अविनाश कदम व समस्त दैनिक अभिकर्ता , कर्मचारी उपस्थित होते.

Total Page Visits: 1370 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top