
NANDED TODAY : 11,April,2021 नांदेड शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने महापालिका आयुक्त डॉ सुनिल लहाने यांनी नांदेड शहरातील व्यापारी संघटना यांची दि.७ रोजी बैठक घेऊन
शासनाने परवानगी देण्यात आलेल्या आस्थापनेच्या ४५ वर्षावरील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे व आस्थापनेत काम करणाऱ्या ४५ वर्षा खालील व्यक्तिंनी
आरटीपीसीआर तपासणी अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र दि.१० एप्रील पर्यंत दुकानात ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.
मा.आयुक्त डॉ सुनिल लहाने यांनी आज शहरातील भारत मेडिकल बर्की चौक, भसीन मेडिकल, संजय मेडिकल ,नोमुलवार मेडिकल (सर्व जुना मोंढा)या दुकानात काम करणाऱ्यांची कोविड लसीकरण व
आरटीपीसीआर तपासणी अहवाल आहे किंवा कसे याबद्दल तपासणी केली असता संबंधित अस्थापनेने तपासणी केली नसल्याचे आढळून आले त्यामुळे वरील चार आस्थापनांना अनुक्रमे
१६०००,१३०००,१४०००,११००० असा एकुण ५४०००/रूपयांचा दंड वसूल
करण्यात आला.
महापालिकेच्या वतीने सर्व आस्थापनेवरील व्यक्तींनी लसीकरण करून घ्यावे किंवा आरटीपीसीआर तपासणी चा निगेटिव्ह
अहवाल सोबत ठेवावा अन्यथा नियमानुसार दंड वसुल करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.
यावेळी मा.आरोग्य विभाग प्रमुख अजितपालसिंग संधू, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.सुरेशसिंह बिसेन,सहा.आयुक्त सुधिर इंगोले ,सहा.आयुक्त मल्हार मोरे , वहीदु जमा व कर्मचारी यांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला