
NANDED TODAY:27,Nov,2021 अविनाश पठाडे,माहूर – माहूर तालुक्यातील रेती घाटाचे लिलाव झालेले नसतांना मौजे टाकळी, पडसा, लिंबायत, मदनापूर, हडसनी, दिगडी व इतर रेतीघाटातुन रेतीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरु असल्याने रेती तस्करीला
आळा घालणे बाबत निवेदन प्रहार जनशक्ती युवा उपाध्यक्ष एकनाथ मानकर यांनी तहसीलदार माहूर यांना दिले आहे. कोणत्याही रेती घाटाचा अद्याप लिलाव झालेला नसतांना मौजे टाकळी, पडसा, लिंबायत, मदनापूर हडसनी, दिगडी व इतर रेतीघाटातुन रेतीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरु आहे.

अवैध रेतीची वाहतूक करणारी वाहने सुसाट वेगाने रस्त्यावरून धावत असते त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करीत आहेत. तसेच रेतीच्या अवैध उत्खननामुळे शासनाचे मोठ्या
प्रमाणात महसुली नुकसान होत आहे. तसेच अवैध रेती तस्करीमुळे गुन्हेगारी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मौजे टाकळी, पडसा, लिंबायत, मदनापूर, दिगडी व इतर रेतीघाटातुन रेतीचे मोठ्या प्रमाणात

उत्खनन सुरु असल्याने रेती तस्करीला आळा घालून शासनाचे होत असलेले नुकसान टाळण्याची विनंती निवेदनात केली आहे. यावेळी संकेत राठोड, कुलदीप राठोड, विजय राठोड, सलमानलाला, अरविंद नेवारे, निलेश रनमले, आदि उपस्थित होते.