
NANDED TODAY: 12,Sep,2021 मुंबई अंधेरी ईस्ट साकिनाका घटना अमानुष – महिला वरील होणारे अत्याचार थांबवा – प्राणिताताई देवरे चिखलीकर छत्रपती शिवरायांच्या राज्यात अत्याचाराच्या अन्यायाच्या बलात्काराच्या अनेक घटना रोज रोज घडत आहे.
मुंबई तील साकीनाका येथे एका तीस वर्षीय महिलेवर बलात्काराची व अमानुष अत्याचाराची घटना घडली, त्या पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या अमानुष घटनेतील आरोपी अटक झाला पण असा वारंवार घडणाऱ्या घटना होऊ नये यासाठी राज्यसरकाराने गांभीर्याने घ्यायला पाहिजे पण महिला अत्याचार वाढताहेत .
पुरोगामी राज्यातील अशा घटना निश्चितच सरकारचे अपयश होय. नराधमांवर सरकारचा वचक राहिला नाही असा तीव्र शब्दात भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुंबईतील साकिनाका भागातील महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर तिच्या सोबतचा अमानवीय प्रकार समोर आला होता. पिडीतेची जगण्याची झुंज अपयशी ठरली.

या घटनेचा राज्यभर तीव्र निषेध व्यक्त होतो आहे पण ती अभागी महिला कुठल्या वेदनेतून गेली असशील याची कल्पनाही करवत नाही.एवढे भयाण-अमानवीय कृत्य तिच्या सोबत झाले .
सरकार मात्र असा घटनेतून कोणताच बोध घेत नाही का?असा प्रश्न उपस्थित होतो असे सांगून महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी या सरकार व व्यवस्थेला याचं घेणंदेणं नाही.
त्यांच्यासाठी पीडितेचा मृत्यू म्हणजे फक्त अजून एकाची भर असेच आहे की काय? असा सवाल त्यांनी सरकारी व्यवस्थेला केला आहे.
अजूनही महिला आयोगाचा पद रिक्त आहे महिलांवर होणारे अन्याय अत्याचार दररोज मोठ्या प्रमाणात वाढतात महा विकास आघाडी सरकारने आता तरी जागे व्हावे

नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा करावी पीडितेला न्याय द्या.अशी मागणी करताना त्यांनी लाज वाटते सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतांना. नाही वाचवू शकलो तुला या शब्दात “त्या ‘पीडित महिलेला त्यांनी पक्षाच्यावतीने व मतदारसंघाच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
अशा घटनेत नराधमावर शासनाचा वचक राहिलेला नाही परस्त्री मातेसमान मानणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या राज्यात छत्रपती शाहू महाराज- म.फुले- डॉ बाबासाहेब आंबेडकर- अण्णा भाऊ साठे, यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात, जिजाऊ-अहिल्या-सावित्री-रमाई च्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या या राज्यात आज महिला सुरक्षित नाहीत?
या नराधमांना वेळीच आवर घातला नाही तर आणखी साकिनाका घडेल? अनेक निर्भयाना आपला जीव गमवावा लागेल.तेव्हा आघाडी सरकार, ” आता तरी जागे
व्हा,” माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा जाहीर निषेध या शब्दात भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे-चिखलीकर यांनी सरकारवर टीका केली आहे.