NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष गरजु रुग्णांसाठी ठरतोय वरदान

रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी मागील सहा महिन्यात 3 कोटी 31 लाख रुपयांचे अर्थसहाय्य वितरीत





नांदेड, दि. 18 जुलै : मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष पात्र व गरजु रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. 1 जानेवारी ते 30 जून 2025 या कालावधीत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातून नांदेड जिल्ह्यात 385 रुग्णांना 3 कोटी 31 लाखांची मदत देण्यात आली. दिवसेंदिवस मदतीमध्ये वाढ होत आहे. गरजू रुग्णांना वेळेत मदत मिळावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून जिल्हा स्तरावर कक्ष उपलब्ध झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे असे रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांनी सांगितले.

राज्यातील नागरिकांना दुर्धर आजारांवरील उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून आर्थिक सहाय्य देण्यात येते. तसेच आपत्ती प्रसंगीही आर्थिक मदत देण्यात येते. यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून मदत मिळविण्यासाठी नागरिक मंत्रालयात जात असत. परंतु नागरिकांना या सेवा सहजपणे त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी उपलबध व्हाव्यात, म्हणून आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सध्या नांदेड येथे हा कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रशिक्षण भवनच्या इमारतीत कार्यरत आहे.

वैद्यकीय उपचाराकरिता मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाशी संलग्नीत नांदेड जिल्ह्यातील खालील रुग्णालयांचा समावेश आहे. या निधीच्या मदतीतून रुग्ण या रुग्णालयात उपचार करुन घेतात. 21st सेन्चुरी हॉस्पिटल नांदेड, अभ्युदय लाईफ केअर सुपर स्पेशालिटी इनस्टीटयुट प्रा. ली. नांदेड, आनंद कँसर आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल नांदेड, अंकुर मॅक्स क्रीटीकल केअर नांदेड, अपेक्षा क्रिटीकल केअर सेंटर आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा. ली. नांदेड, अश्विनी क्रिटीकल आणि हार्डकेअर सेंटर प्रा. ली. नांदेड, अथर्व सर्जिकल हॉस्पिटल, नांदेड, भगवती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड, गोदावरी इनस्टुटयुट ऑफ क्रिटीकल  केअर मेडीसीन नांदेड, गर्व्हमेंट मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटल नांदेड, गुरुकृपा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल डॉक्टर लेन नांदेड, लव्हेकर हॉस्पीटल नांदेड, लोटस हॉस्पिटल नांदेड, मोनार्क कॅन्सर हॉस्पिटल नांदेड, मुंडे हॉस्पिटल देगलूर, जि. नांदेड, नांदेड क्रिटीकल केअर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नांदेड, नारायणा इनस्टुटयुट ऑफ मेडीकल सुपर स्पेशालिटी नांदेड, निर्मल न्युरो केअर ॲण्ड सुपर स्पेशालीटी सेंटर नांदेड, रेंगे  हॉस्पिटल नांदेड, साई हॉस्पिटल सर्जीकल ॲण्ड ॲक्सीडेंट नांदेड, संजीवन हॉस्पिटल नांदेड, श्री गंगा हॉस्पिटल नांदेड, श्रीनिवास ऑथोपेडीक नर्सिग होम नांदेड, एसएसपी केअर ॲडव्हॉस पॅट्रीओट्रीक सेंटर प्रा. ली. नांदेड, सनराईज ग्लोबल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड, विश्वा इनस्टुटयुट न्युरोलॉजी ॲण्ड किडनी सेंटर प्रा. ली. नांदेड, विश्व प्रयाग हॉस्पिटल नांदेड, यशश्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड, यशोसाई क्रिटीकल केअर कौठा, नांदेड, यशोसाई हॉस्पिटल नांदेड, यशोसाई ऑर्थोपेडिक हॉस्पिटल कौठा, नांदेड या रुग्णालयाचा समावेश आहे. तरी गरजू व पात्र रुग्णांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. 
00000