
NANDED TODAY:नांदेड, दि. 2 ऑगस्ट युवतीची छेड काढणार्याचा विरोध केल्याने एकास बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना दि. 31 जुलै रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास
शहरातील टिळकनगर कॉर्नर येथे घडली. या प्रकरणी विमानतळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करणयात आला आहे.
शहरातील टिळक कॉर्नर परिसरात दि. 31 जुलै रोजी काही टवाळखोर युवक एका युवतीची छेड काढत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जितेंद्र शिवराम गायकवाड
यांनी या टवाळखोरांना हटकले असता छेड काढण्यास विरोध केल्याने शुभम जोंधळे कोकटे व अन्य दहा ते पंधरा जणांनी जितेंद्र गायकवाड यांस रॉड व लाथा बुक्याने
मारहाण करुन गंभीर जखमी केले. यात जितेंद्र गायवाड यास डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे.
या प्रकराणी जितेंद्र गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शुभम जोंधळे, कोकाटे व अन्य जणांविरुद्ध विमानतळ पोलीस स्थानकात कलम 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.