रद्द करण्यात आलेल्या आदिलाबाद – हुजूर साहिब नांदेड आणि हुजूर साहिब नांदेड -आदिलाबाद इंटर सिटी एक्स्प्रेस उद्या दिनांक 22 नोव्हेंबर रोजी पूर्ववत धावणार – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > रद्द करण्यात आलेल्या आदिलाबाद – हुजूर साहिब नांदेड आणि हुजूर साहिब नांदेड -आदिलाबाद इंटर सिटी एक्स्प्रेस उद्या दिनांक 22 नोव्हेंबर रोजी पूर्ववत धावणार

रद्द करण्यात आलेल्या आदिलाबाद – हुजूर साहिब नांदेड आणि हुजूर साहिब नांदेड -आदिलाबाद इंटर सिटी एक्स्प्रेस उद्या दिनांक 22 नोव्हेंबर रोजी पूर्ववत धावणार

Spread the love

NANDED TODAY:22,Nov,2021 विजयवाडा विभागातील, नेल्लोर-पादुगुपडू सेक्शन मध्ये आणि गुंटकळ विभागातील राझामपेत-नंदालूर सेक्शन मध्ये रेल्वे पटरीवर आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे रेल्वे गाड्यांच्या चलनावर परिणाम झाला आहे.

दक्षिण मध्य रेल्वे च्या मुख्यालयाने कळविल्या नुसार या कार्यालयाने दिनांक 21.11.2021 रोजी प्रेस नोट क्र. 96 नुसार गाडी संख्या 17409 आदिलाबाद-हुजूर साहिब नांदेड आणि गाडी संख्या 17410 हुजूर साहिब नांदेड –आदिलाबाद या दोन गाड्या दिनांक 22 नोव्हेंबर रोजी रद्द करण्याचे कळविले होते.

परंतु दक्षिण मध्य रेल्वे मुख्यालयाने आत्ताच कळविले आहे कि या रद्द करण्यात आलेल्या दोन गाड्या दिनांक 21.11.2021 रोजी पुन्हा पूर्ववत धावतील.

त्यानुसार गाडी संख्या 17409 आदिलाबाद-हुजूर साहिब नांदेड आणि गाडी संख्या 17410 हुजूर साहिब नांदेड –आदिलाबाद इंटर सिटी एक्स्प्रेस या दोन गाड्या दिनांक 22 नोव्हेंबर, 2021 रोजी आपल्या वेळेनुसार धावतील, प्रवाशांकरिता या रेल्वे सेवा उपलब्ध असतील.

या कार्यालयाने दिनांक 21.11.2021 रोजी प्रेस नोट क्र. 96 नुसार दिलेल्या इतर माहिती मध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

आदरणीय संपादक महोदयांना विनंती आहे हि बातमी आपल्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध करावी.
जनसंपर्क कार्यालय, नांदेड

Total Page Visits: 800 - Today Page Visits: 2

Spread the love

Leave a Reply

Top