
NANDED TODAY:27,Feb,2021 राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने मी जबाबदार ही मोहीम नांदेड शहरातील चौकाचौकात राबविण्यात आली!
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष कन्हैया कदम यांच्या नेतृत्वाखाली मी जबाबदार ही मोहीम नांदेड शहरातील चौकाचौकात राबविण्यात आली. देशभरामध्ये मागच्या एक वर्षापासून कोरोना या विषाणूने थैमान घातलेला आहे. कोरोना या रोगाची लागल देशभरामध्ये आता पर्यंत लाखो लोकांना झाली आहे.
यामध्ये आपले राज्य तसेच आपला नांदेड जिल्हा सुद्धा मागे नाहीये काही दिवसापूर्वी कोरोनाच संकट हे कमी झालं असं वाटत होतं, परंतु मागील दहा-पंधरा दिवसापासून कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे,
त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने मी जबाबदार ही मोहीम अमलात आणली, या मोहिमेला प्रतिसाद देत नांदेड शहरातील आयटीआय चौक येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष कन्हैया कदम व पदाधिकारी, देगलूर नाका येथे फैसल सिद्दिकी, राज कॉर्नर येथे मोहम्मद दानिश, वजीराबाद येथे सविंदर सिंग संत, वर्कशॉप कॉर्नर येथे विजय मोरे, भाग्यनगर येथे महेश कल्याणकर, आनंदनगर येथे
योगेश किर्रकण, हिंगोली गेट येथे शारिक अहमद, विष्णुपुरी येथे डॉ.गौतमी आनंद व डॉ.प्रतिक्षा शिंदे, गुरुद्वारा चौक येथे गोविंद भारती व दिगंबर कपाळे, वजीराबाद चौक अंश वैष्णव व साहिल पाटील, महाराणा प्रताप पुतळा येथे परमेश्वर जाधव, अण्णाभाऊ साठे चौक येथे मुजाहिद खान, तरोडा नाका येथे ऋषिकेश गीते व आरिब पठाण, भावसार चौक येथे सचिन फोले व नागेश वाघमारे हरीश कवठेकर या पदाधिकार्यांनी हातामध्ये एक फलक घेऊन मी जबाबदार या मोहिमेचे आव्हान केले.