लोकांच्या संपर्कात राहूनच आपल्या पक्षाला भरघोस यश मिळेल – ना. जयंत पाटील – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > लोकांच्या संपर्कात राहूनच आपल्या पक्षाला भरघोस यश मिळेल – ना. जयंत पाटील

लोकांच्या संपर्कात राहूनच आपल्या पक्षाला भरघोस यश मिळेल – ना. जयंत पाटील

Spread the love

NANDED TODAY:28,June,2021 ( Naeem Khan @ 9960606333) लोकांच्या संपर्कापासून दूर जाऊ नका, त्यांच्या संपर्कात राहूनच आपल्या पक्षाला भरघोस यश मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी व्यक्त केला. संघटना बांधणीकडे दुर्लक्ष करु नका. संघटनेतून नवी पिढी पुढे आणली पाहिजे. सक्षम, खंबीर व आदरणीय शरद पवारसाहेबांचा विचार तळागाळात पोहचवणारा कार्यकर्ता तयार करा,

असे आवाहन जयंत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याच्या आजच्या पाचव्या दिवशी आज माहूर – किनवट विधानसभा मतदारसंघाचा आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत जयंत पाटील यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना बुथ कमिट्या सक्षम करण्याचे आवाहन केले.

याआधी पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन जयंत पाटील यांनी केले. माजी आमदार प्रदीप नाईक यांनी यावेळी मतदारसंघात विकासकामांची मागणी केली.
या आढावा बैठकीला मराठवाडा संपर्क प्रमुख व माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर,

जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर, माजी आमदार प्रदीप नाईक, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, अल्पसंख्याक सेल प्रदेशाध्यक्ष मोहम्मद खान पठाण, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे,

डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, महिला जिल्हाध्यक्ष प्रांजली रावणगावकर, माहूर नगराध्यक्ष शितल जाधव, तालुकाध्यक्ष मेघराज जाधव आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Total Page Visits: 879 - Today Page Visits: 4

Spread the love

Leave a Reply

Top