विदर्भ व मराठवाडयास जोडणाऱ्या चातारी पुलास मंजुरी! हिमायतनगर तालुक्यातील चातारी गावाजवळ 30 कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात येणार..! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > विदर्भ व मराठवाडयास जोडणाऱ्या चातारी पुलास मंजुरी! हिमायतनगर तालुक्यातील चातारी गावाजवळ 30 कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात येणार..!

विदर्भ व मराठवाडयास जोडणाऱ्या चातारी पुलास मंजुरी! हिमायतनगर तालुक्यातील चातारी गावाजवळ 30 कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात येणार..!

Spread the love

NANDED TODAY:06,March,2021 गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागांना जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील पुलाच्या कामाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उद्धवसाहेब ठाकरे व राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांनी चालू असलेल्या अर्थसंकल्पपीय अधिवेशनात 30 कोटी रू. देण्याचा निर्णय घेतला आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या महत्वपूर्ण विकास कामासाठी घेतलेल्या निर्णयाचे मी #राज्याचेमुख्यमंत्रीमानाउध्दवसाहेब_ठाकरे यांचे आभार मानतो.

सदरील पुलाचे काम हिमायतनगर तालुक्यातील चातारी गावाजवळ 30 कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात येणार असून नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात यवतमाळ जिल्हा सीमा दिघी-जवळगाव-सोनारी फाटा-दूधड ते राज्य सीमा रस्त्यावरील चातारी गावाजवळ पैनगंगा नदीवर पोच मार्गासह हा मोठा पूल बांधण्यात येणार आहे. तसेच या पुलामुळे दोन्ही विभागातील अनेक गावांना फायदा होणार आहे.

या शिवाय हिमायतनगर व हदगाव तालुक्यातील नागरिकांना विदर्भातील (हिंगोली लोकसभा मतदारसंघात) उमरखेड-महागावकडे जाण्यासाठी 50 कि. मी. एवढ्या अंतरावरून फेरा मारून जावे लागते परिणामी चातारी गावाजवळ होणाऱ्या या पुलामुळे विदर्भ- मराठवाड्यातील लोकांना ये-जा करण्यासाठी 25 कि. मी. इतके अंतर कमी होणार आहे. अगोदरच या भागातील विसरणी ते वाघी-जवळगाव हा भाग राष्ट्रीय महामार्ग क्र. 752 आणि सोनारी फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.761 (अ) झाला असल्याने या दोन्ही विभागांना पूल महत्वाचा ठरणार आहे.

Total Page Visits: 1316 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top