
NANDED TODAY:3,August,2021 नांदेड/प्रतिनिधी–विध्याथ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असून जेष्ठ शिक्षक सय्यद जैन्नोद्दीन अकबरसाब व जेष्ठ शिक्षीका सौ.यशोदा पैंजणे यांनी त्यांच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केल्यामुळेच ते
सत्काराला पात्र असल्याचे प्रतिपादन संस्थेच्या सहसचिव तथा श्रीनिकेतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.सौ.एस एन. राऊत यांनी केले. दिपकनगर येथील श्रीनिकेतन प्राथमिक शाळेतील शिक्षक सय्यद जैन्नोद्दीन व शिक्षीका

सौ.यशोदा पैंजणे अनुक्रमे 32 व 33 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत असल्याबद्दल आयोजित सेवापूर्ती सत्कार कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप करताना मुख्याध्यापिका डॉ.सौ.एस.एन. राऊत बोलत होत्या.
विचार मंचावर श्रीनिकेतन हायस्कूलचे मुख्याध्यापक यशवंत थोरात, सेवानिवृत्त जेष्ठ लिपिक विलास नरवाडे आदींची उपस्थिती होती.
आयोजित कार्यक्रमात सर्वप्रथम महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे , लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी सेवानिवृत्त शिक्षक सय्यद जैन्नोद्दीन व

सौ.यशोदा पैंजणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सय्यद जैन्नोद्दीन व यशोदा पैंजणे यांनी शाळेतील प्रदिर्घ अनुभव सांगताना विद्यार्थीच्या सर्वांगीण विकासासाठी पालक भेट महत्त्वाची असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद आयनेले यांनी तर उपस्थितीतांचे आभार अविनाश इंगोले यांनी मानले. कार्यक्रमास,श्रीधर पवार, प्रल्हाद आयनेले, अविनाश इंगोले, सुदर्शन कल्याणकर, बाळकृष्ण राठोड,सौ.बुधांगना गोखले आदींची उपस्थिती होती.
