वीज कामगार को- ऑफ सोसायटीच्या निवडणुकीत कृती समिती एकता पॅनलचा दणदणीत विजय. – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > वीज कामगार को- ऑफ सोसायटीच्या निवडणुकीत कृती समिती एकता पॅनलचा दणदणीत विजय.

वीज कामगार को- ऑफ सोसायटीच्या निवडणुकीत कृती समिती एकता पॅनलचा दणदणीत विजय.

Spread the love

नांदेड टुडे 17,मई,2022 प्रतिनिधी: वीज कामगार को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड नांदेड पंच वार्षिक निवडणुकीत २०२२-२७ खाजगीकरण व कामगार धोरणा विरुद्ध राज्य व केंद्रीय स्तरावर

लढणाऱ्या प्रमुख सहा संघटनाच्या कृती समिती एकता पॅनलच्या सर्व १५ च्या १५ उमेदवाराचा प्रचंड मताधिक्याने दणदणीत विजय झाला.

या मध्ये कृती समितीसह अन्य ३ पॅनलने निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावले होते.

यात सद्भावना पॅनलचे प्रमुख प्रमोद क्षिरसागर ,स्वतंत्र बहुजन पॅनल ,आणि अपक्ष आम आदमी यांचा मात्र सदर निवडणुकीत दारुण पराभव झाला.

कृती समिती एकता पॅनल मध्ये प्रमुख संघटना सबाॅर्डिशन इजिनिअर्स असोसिएशन , महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स

फेडरेशन महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार युनियन, इलेक्ट्रिकल लाईन मॅन असोशियन (ईएलए ), महाराष्ट्र राज्य विद्युत

ऑपरेटर संघटना आणि महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस ( इंटक) आहेत.

वीज कामगार को-ऑपरेटिव्ह सोसायटी निवडणुक १५ मे २०२२ रोजी झालेल्या मतदानामध्ये ८७ सभासदाने सहभाग नोंदविला. सभासदाचा

असलेला सहभागच निवडणुकीच्या निकालाचा कल दर्शवत लोकशाहीवरचा विश्वास दरड करणारा होता. वीज कामगार को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मध्ये

एकूण १८०० सभासद आहेत पैकी १३७९ उमेदवार मतदानासाठी पात्र होते.त्यात ११८२ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला.

पतसंस्थेतील एकूण निकाल हा ऐतिहासिक ठरला, कारण कृती समिती एकता पॅनलचे सर्वच्या सर्व १५ संचालक निवडून

आले. या पतसंस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एकूण चार पॅनलने आपले नशीब आजमावले होते.

यात सद्भावना पॅनल ,स्वतंत्र बहुजन पॅनल, आम आदमी पॅनल या तिन्ही पॅनलचा मात्र दारुण पराभव झाला.

यात सर्वसाधारण गटामधून महेश वाघमारे, ईश्वर सिंग टेलर, भोकर येथील २२० महापारेषण विद्युत केंद्रावर कार्यरत असणारे वरिष्ठ यंत्रचालक बालाजी मेखाले, वरिष्ठ तंत्रज्ञ सतिश

आनंदराव वाघमारे ,धोंडीबा गोत्रम , प्रल्हाद बट्टेवाड , रमेश वडगावे, राजेश सोनकांबळे, सचिन सोनसळे, बालाजी स्वामी,

तर महिला राखीव गटामधून शेख यास्मीन, सौ राजनंदनी सोनकांबळे, निवडून आल्या.

तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती विमाप्र गटामधून सतीश निशानकर अनुसूचित जाती जमाती गटामधून कैलास राऊत

आणि इतर मागासवर्गीय गटामधून अभि.अविनाश रामगिरवार हे निवडून आले.

या निवडणुकीत कृती समिती एकता पॅनल चा दणदणीत विजय होताच नवनिर्वाचित संचालक

मंडळाचे कॉ. पंडित तेलंग अभि. जी एस थळगे,
पवार,मो.खलील, शेख नासिर,स.बच्चनसिंग,रवि भागें,श्रीरामवार, प्रशांत मस्के, माधव चिलटे,उमेश थळगे, संजय लोढे, शेख खाजा, सुनिल लगंडे, आदित्यनाथ

बुरांडे,सेवानिवृत्त वनपाल एम.के.सिरसे,बि.एम.गायकवाड , जिल्हा परिषद हायस्कूल येताळचे उपमुख्याध्यापक अशोक कांबळे मरवाळीकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य

लिपिक गंगाधर वाघमारे धानोरकर, बहुभाषिक पत्रकार संघाचे सचिव धडेकर गंगाधर , मा.सरपंच हौसाजी वाघमारे,

सामाजिक कार्यकर्ते बाळू गायकवाड , बांधकाम गुत्तेदार राष्ट्रपाल वाघमारे,
क्रांती सोनकांबळे ,राजु धडेकर, मनोज

कांबळे,सोना वाघमारे, अविनाश धडेकर यांच्या सह अधिकारी कर्मचारी यांनी स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.

Total Page Visits: 301 - Today Page Visits: 2

Spread the love

Leave a Reply

Top