
NANDED TODAY:29,July,2021 नांदेड/प्रतिनिधी नांदेड शहरातील विविध भागातील समस्यांमुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. ड्रेनेज, नाली सह सखल भागात साचलेले पाणी यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे तर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने

वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. या समस्या तात्काळ सोडवाव्यात अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रऊफजमीनदार यांच्यावतीने महापालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.

मागील आठवड्यात जिल्ह्यातमोठा पाऊस झाला या पावसामुळे नांदेड शहरातील देगलूरनाका, बसस्थानक, रेल्वे स्थटेशन, डॉक्टर लेन, जुना नांदेड, ईतवारा, सांगवी, तरोडा नाका आदी भागामध्ये जागोजागी नाल्या तुंबल्याने ड्रेनेजचे पाणी

रस्त्यावरून वाहत होते शिवाय शहरातील बर्याच ठिकाणी खुल्या जागेत, सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पाण्याची दुर्गंधी सुटली आहे. सखल भागातील पाण्यावर मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्याने परिसरातील नागरिकांच्या

आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. शिवाय झालेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची दाणादाण ऊडाली आहे. रस्ते खरडून गेल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले आहेत. महापालिकेकडून डागडूजी होत असली तरी केवळ
कोरडी गिट्टी टाकून थातूरमातूर काम होत आहे. खड्ड्यातून वाहन जाताच पुन्हा ती गिट्टी रस्त्यावर येवून त्या जागी खड्डा पडत आहे. शहरातील रस्ते, नाली, ड्रेनेज यांच्या समस्या गंभीर बनल्या आहेत. महापालिकेने ड्रेनेजची कामे तात्काळ
करावीत. देगलूरनाका भागात अद्यापही ड्रेनेज लाईन टाकण्यात आली नाही ती
तात्काळ टाकावी. याच भागात काही ठिकाणी पक्क्या नाल्या झाल्या नाहीत त्या नाल्या तात्काळ बांधण्यात याव्यात व सखल भागातील साचलेल्या पाण्यावर फॉग

मशिनद्वारे धुर फवारणी करावी अथवा जंतूनाशक टाकण्यात यावे. यासह आदी मागण्यांचे निवेदन महापालिका आयुक्त सुनिल लहाने यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमीनदार यांच्या शिष्टमंडळाने केली. यावेळी
निखील नाईक, गगनदिप रामगडीया, लखनसिंघ लांगरी, नईम खान, अतिक बिल्डर, चरनजितसिंघ, परिक्षीत कोकरे यांच्यासह आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.!