शिवसेना नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकरांनी कृषी मंत्र्यांकडे सरसकट पंचनामे करण्याची केली मागणी – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > शिवसेना नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकरांनी कृषी मंत्र्यांकडे सरसकट पंचनामे करण्याची केली मागणी

शिवसेना नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकरांनी कृषी मंत्र्यांकडे सरसकट पंचनामे करण्याची केली मागणी

Spread the love

NANDED TODAY:29,Sep,2021 नांदेड – हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सोमवारपासून जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरु आहे. परिणामी दोन दिवस सुरू आसलेल्या मुसळधार पावसाने नांदेड शहरासह ग्रामीण भाग जलमय झाला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी-नाले तुडुंब भरल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

यात शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी कृषी मंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी संवाद साधुन सरसकट पंचनामे करण्याची मागणी केली आहे. यावेळी आ. कल्याणकर यांनी थेट शेतकर्यांसोबत कृषी मंत्री दादा भुसे यांच्याशी संवाद घडवून दिला आहे.

दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सर्वच नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तसेच शेत शिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी थेट आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर दोन दिवसापासून नांदेड उत्तर मतदारसंघात पाहणी करत असून मंगळवारी पूर परिस्थिती निर्माण झालेल्या भागात

जाऊन आ. कल्याणकर यांनी नागरिकांना धीर दिला आहे. निळा, एकदरा, आलेगाव,सुगाव, बोंढार, चिखली, पासदगाव, नेरली, चिमेगाव या भागातील शेतकर्याचे फोन आले असता आपल्या गावात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

त्याबरोबर शहरात देखील पहाणी केली. यावेळी आ. बालाजी कल्याणकर यांनी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याशी निळा येथील शेतकर्यांचा संवाद साधून दिला आहे. तसेच मतदार संघातील परिस्थितीचा आढावा कृषिमंत्र्यांना कळविला आहे.

त्याबरोबरच सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याबाबत सूचना केल्या आहेत. यावेळी कृषिमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला सुचना देखील केल्या आहेत. तसेच आ. बालाजी कल्याणकर यांनी जिल्हाधिकारी,

जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी देखील संवाद साधून पूर परिस्थिती निर्माण झालेल्या भागात लक्ष ठेवण्याबाबत व सरसकट पंचनामे करण्याबाबत सूचना केल्या आहेत.

Total Page Visits: 421 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top