शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याबाबतचे पत्र नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना दिले. – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याबाबतचे पत्र नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना दिले.

शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याबाबतचे पत्र नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना दिले.

Spread the love

NANDED TODAY:07,Oct,2021 मुंबई : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून पावसामुळे नुकतीच पेरणी करण्यात आलेले सोयाबीनसह इतर पिके पिवळी पडत आहेत. शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.

अगोदरच शेतकरी संकटात असताना पुन्हा अस्मानी संकटाने शेतकऱ्यांवर खूप मोठा आघात केला आहे. अशा परिस्थितीत अतिवृष्टीग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यात यावी, अशी मागणी नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे!

महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर आरोप करताना शेतकर्यांना तातडीने मदत देण्याबाबत नांदेड़ची पत्रकार परिषदला सांगितले होते.

नांदेड़ दौरेवार असतांना देवेंद्र फडणवीस यांनी मीडिया समोर सांगितले की अतिवृष्टी गारपीट ढगफुटी भूकंप यासारखी नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास सरकारने सजग राहून तात्काळ पंचनामे करण्याबाबत आदेश देणे आवश्यक आहे,

परंतु महा विकास आघाडी सरकारने अद्याप कोणत्याही प्रकारचे पंचनामे करण्यासंदर्भात आदेश दिले नाहीत. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला महाविकास आघाडी सरकार काहीही करत नाही,

नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे अनेक शेतकर्यांचे नुकसान झाले होते आणि यापैकी अनेक शेतकर्यांकडून नांदेड़ उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी नुकसान झालेल्या शेतांचा आढावा घेतला

आणि शेतकर्‍यांना लवकरात लवकर सरकारी मदत देण्याची शक्यता व्यक्त करुण आज त्यांनी शेतकर्‍यांच्या नुख्सान भरपाई निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याबाबतचे पत्र दिले

Total Page Visits: 614 - Today Page Visits: 2

Spread the love

Leave a Reply

Top