श्री.डॉ. हंसराजजी वैद्य के नाम.! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > श्री.डॉ. हंसराजजी वैद्य के नाम.!

श्री.डॉ. हंसराजजी वैद्य के नाम.!

Spread the love

पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने देण्यात येणारा वर्ष 2018 चा अत्यंत प्रतिष्ठेचा नांदेड भूषण पुरस्कार आपणास प्रदान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारे आपण वैद्यकीय क्षेत्राबरोबरच शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, क्रीडा, कृषी, राजकीय अशा एक ना अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गेली साडेतीन दशके आपण समाजाची विविधांगाने सेवा केली आणि करत आहात.

एक व्यक्ती काय- काय करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपण आहात. आरोग्य सेवा ही बाब आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू असला तरीही ज्येष्ठ नागरिक, अनाथ, निराधार व्यक्ती, महिला, परित्यक्त्या, विधवा, बालक यांच्याशी संबंधित अनेक समित्या आणि परिषदांवर आपण

निष्ठेने काम करत आहात. राष्ट्रीय संपत्ती, पर्यावरण त्याचबरोबर विविध वर्तमानपत्रे, साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आपण दिलेले योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. राज्य शासन महिला आणि बाल

विकास समिती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री भ्रूण हत्या, महिलांचे पुनर्वसन यासाठीचे आपले भरीव योगदान विसरता येणार नाही. आपण साहित्य क्षेत्रातही नाव उंचावले आहे. आपल्या तीन काव्यसंग्रहाबरोबरच “आई ” या विषयावरील गीतांच्या सीडी खूप गाजल्या आहेत. कृषी क्षेत्रावरही आपली

नितांत श्रद्धा आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी जाणिवांच्या शिबिराचे आयोजन करून आपण शेतीमध्ये अनेक प्रयोग राबविले आहेत. अर्थात पर्यावरणाचे संतुलन राखण्याचा आपला प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. आपल्या या कार्यासाठी शासनाचे आणि विविध संस्था संघटनांचे अनेक सन्मान

आपणास प्राप्त झाले आहे. विविध क्षेत्रात यशाचे उंच शिखर गाठून आपण आपल्या कार्याने हजारोंच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. यासाठीच नांदेडच्या इतिहासातील अतिशय महत्त्वपूर्ण

आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा नांदेड भूषण पुरस्कार या पुरस्काराचे मानपत्र आपणास सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहे.
आपल्या भावी वाटचालीस आरोग्यमय शुभेच्छा आणि आपले खूप खूप अभिनंदन..!

शब्दांकन : कुमार अभंगे

Total Page Visits: 38 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top