स्कोडा कार झाडावर आदळल्यामुळे सेवानिवृत्त वन अधिकारी नारायण कटकमवार मृत्यू , तर त्यांचे दोन मुले गंभीर जखमी.! – NANDED TODAY NEWS
You are here
Home > Daily News > स्कोडा कार झाडावर आदळल्यामुळे सेवानिवृत्त वन अधिकारी नारायण कटकमवार मृत्यू , तर त्यांचे दोन मुले गंभीर जखमी.!

स्कोडा कार झाडावर आदळल्यामुळे सेवानिवृत्त वन अधिकारी नारायण कटकमवार मृत्यू , तर त्यांचे दोन मुले गंभीर जखमी.!

Spread the love

NANDED TODAY KINWAT:31,August,2021 ( प्रतिनिधी अकरम चौहान) किनवट पासून 16 कि.मी. अंतरावर अंबाडी घाटात स्कोडा कार झाडावर आदळल्यामुळे सेवा निवृत्त वन अधिकारी नारायण कटकमवार यांना छाती व डोक्यात जबर मार लागला शहरातील साने गुरूजी रुग्णालयात दाखल केले असता

उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांचे दोन मुले गंभीर जखमी आहेत. ही घटना आज सकाळी १२ ते १ वाजता दरम्यान घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, किनवट येथील सेवानिवृत्त वनाधिकारी
व गोदावरी अर्बन बँकेचे सल्लागार नारायण संट्टना कटकमवार वय ६४ वर्ष हे आज सकाळी पायाच्या दुखापतीमुळे उपचारासाठी आदिलाबादकडे जात होते.

यावेळी त्यांच्यासोबत दोन मुले योगेश व महेश होते. अंबाडी घाटात अचानक समोर काहीतरी आल्यामुळे त्यांनी गाडी पलटवण्याचा प्रयत्न करीत असताना गाडीवरील ताबा सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली गाडीचा अपघात इतका तीव्र होता की गाडीच्या समोरील भाग चक्काचूर झाला

त्यात नारायण यांच्या डोक्याला व छातीला जबर मार लागला हे माहिती त्यांच्या नातेवाईकांना पोहोचेपर्यंत याच मार्गावरून मांडवी चे शिक्षक गाडीने किनवट कडे येत होते

त्यांनीच जखमींना गाडीत टाकून सानेगुरुजी रुग्णालयात दाखल केल्याचे समजते या जबर अपघातामुळे त्यांच्या छातीच्या सापळ्या तुटून फुफसांना गंभीर दुखापत झाल्याने

उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे किनवट शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, पत्नी, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे.

मयत नारायण कटकमवार हे खासदार हेमंत पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय असल्याचे समजते या दुर्घटनेत त्यांच्या मुलांनाही जबर मार लागल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी आदिलाबाद येथे हलविण्यात आले आहे.

Total Page Visits: 354 - Today Page Visits: 1

Spread the love

Leave a Reply

Top