NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

जागतिक महिला दिनानिमित्त भाजपा जिल्हा अध्यक्ष डॉ . संतुकराव हंबर्डे यांच्या वतीने सफाई कामगारांचा सत्कार.!

NANDED TODAY: 8,March,2025- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांच्या वतीने भाजपा जिल्हा संपर्क कार्यालयात आज महानगरपालिकेच्या महिला सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला.

राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या लाडकी बहिणी योजनेने असंख्य महिलांच्या जीवनात आर्थिक बदल घडवून आणला आहे . खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारच्या वतीने महिलांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. महिलांचाही सन्मान केला जात आहे .

आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांच्या संपर्क कार्यालयात महानगरपालिकेतील महिला सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांच्यासह मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, जिल्हाध्यक्ष एडवोकेट किशोर देशमुख ,चैतन्यबापू देशमुख, बाळूभाऊ खोमणे, रामराव केंद्रे,

लक्ष्मण ठक्करवाड , माणिकराव लोहगावे , शीतल खंडिल , डॉ . माधव उचेकर , डॉक्टर बालाजीराव गिरगावकर विजय गंभीरे, प्रवीण गायकवाड,सरदार दिलीपसिंघजी सोडी, बालाजी पाटील सकनूरकर, ॲड गंगाप्रसाद यन्नावार, दत्ता पाटील ढगे, प्रशांत दासरवार, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.