NANDED TODAY

NANDED TODAY NEWS

मा. अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी माली गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते.


दिनांक 14/06/2025 रोजी चे 04.35 वाजेच्या सुमारास फिर्यादी मॉनींग वॉकला जात असतांना कृष्णा दुध डेअरी समोर उदयनगर 2 पाटी जवळ वर्कशॉप आनंदनगर रोड जवळ यातील आरोपीतांनी संगणमत करुन फिर्यादीस खंजरने मारहण करुन मोबाईल व हातातील वॉच जबरीने हिसकावुन घेवुन गेले. वगैरे फिर्याद वरुन पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथे गु.र.नं. 336 / 2025 कलम 309 ( 6 ),311,3 ( 5 ) बि. एन. एस सह कलम 4/25, 27 भा.ह. का तसेच सकाळी 05.10 वा अंबिका मंगल कार्यालयासमोर एका व्यक्तीचा मोबाईल हिसकावुन घेवुन गेले. वगैरे फिर्याद वरुन गु.र.न 340 / 2025 कलम 309 (4), 3 ( 5 ) बी. एन. एस प्रमाणे दोन गुन्हे दाखल असुन तपास पोउपनी विनोद देशमुख व पोउपनी वाडेवाले करीत आहेत . वरील प्रमाणे दोन गुन्हे घडल्याची माहीती मिळताच तात्काळ मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब उपविभाग नांदेड शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्री रामदास शेंडगे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड गुन्हे शोध पथकाचे पोउपनी विनोद देशमुख, पोउपनी नरेश वाडेवाले, पोहेकॉ / 818 गर्दनमारे पोकॉ/ 1825 मुंडे, पोकॉ/ 747 चापके पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड.,पोकॉ / 3097 शेख शोयब, पोकॉ / 555 माने पा.स्टे. विमानतळ असे मिळुन शासकीय वाहनाने रवाना होवुन गोपणीय महिती व सी. सी. टी. व्ही फुटेज च्या आधारे आरोपीतांचे नावे निष्पन्न करुन सदर गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेतल्यावरुन ते त्यांचे घरी मिळुन आल्याने त्यांना गुन्हयाबाबत विचारपुस केली असता गुन्हा केल्याचे कबुल करुन गुन्हयातील गेला माल हा यातील आरोपी यांचे नातेवाईकांकडुन दोन पंचासमक्ष सविस्तर जप्ती पंचनामा करुन 100 टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला,
सदरची उत्कृष्ट कामगीरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मा. पोलीस अधीक्षक साहेब यांनी कौतुक केले आहे. जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड