
नांदेड टुडे :24,Sep, 2025 ( नांदेड प्रतिनिधि) 2024 मधील अतिवृष्टी व पुरामुळे नांदेड जिल्ह्यातील हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. शासनाकडून निधी प्राप्त होऊनही तो पुरग्रस्तांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सातत्याने आवाज उठविण्यात आला.

याच मागणीसाठी प्रदेश उपाध्यक्ष फारुक अहमद यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणादरम्यान प्रशासनाशी झालेल्या चर्चेत पुरग्रस्तांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा केली जाईल, असे ठोस आश्वासन प्रशासनाने दिले होते.आज त्या आश्वासनाची पूर्तता झाली असून, एकूण 12,240 पुरग्रस्त लाभार्थ्यांच्या (11,750 + 490) खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात आली आहे.

हे यश हे वंचित बहुजन आघाडीच्या संघर्षाचे, त्यागाचे आणि जनतेच्या समर्थन व एकजुटीचे फलित आहे.वंचित बहुजन आघाडी प्रशासनाचे आभार मानते, मात्र अजूनही जे 2024 व 2025 चे जे पुरग्रस्त शिल्लक आहेत त्यांना मदत पोहोचेपर्यंत संघर्ष सुरू राहील.शाम कांबळे,वंचित बहुजन आघाडीनांदेड.

More Stories
ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइजेशन की पहल से नांदेड के बाबुल गांव मे लेबर कामगारों की घरगुती वस्तु किट अवैध तरीखे से रखने का पर्दा फाश,72 घंटे के बाद भी कामगार उपायुक्त की ओर से पोलिस मे FIR क्यू नही ?
मौलाना मुहम्मद हुजैफा गुलाम वस्तानवी का नांदेड़ दौरा, एडवोकेट कासिम वसीम बाबू सेठ के कार्यालय में जोरदार स्वागत.!
नांदेड येथील प्रसिद्ध समाजसेवक अनवर अहेमद यांची शिवसेना अल्पसंख्यांक विभागाच्या नांदेड जिल्हाप्रमुख पदी निवड