
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. घरगुती, औद्योगित आणि व्यावसायिक ग्राहकांच्या वीजदरात आगामी पाच वर्षात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या वर्षभरात राज्यात दहा टक्के तर टप्प्याटप्प्याने पाच वर्षांत 26 टक्क्यांपर्यंत वीजदर कमी होणार असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करीत याची माहिती दिली.
काय आहे ट्विट..
राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी 10 टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत 5 वर्षांत 26 टक्के वीजदर कमी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.
साधारणत: पूर्वीचा काळ पाहिला तर 10 टक्के वीजदरवाढीच्या याचिका सादर व्हायच्या. पण, राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कमी करण्यासाठी याचिका केली. त्यावरच हा आदेश एमईआरसीने दिला. या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार आहे. राज्यात 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्यांचे प्रमाण हे 70 टक्के आहे.
त्यांच्यासाठी 10 टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील. आमच्या बळीराजाला दिवसा आणि खात्रीचा वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सोबतच आगामी काळात वीजखरेदी करारांमध्ये हरितऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे वीजखरेदी खर्चात बचत होणार आहे. त्यामुळेच हा दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणला मांडता आला. ही बातमी राज्यातील जनतेला देताना मला आनंद होतो आहे.


More Stories
रऊफ जमींदार की पहल से नांदेड मालटेकड़ी ब्रिज दूरुस्ती कार्य के लिए 53 लाख रुपये का बजट मंज़ूर!
ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइजेशन की पहल से नांदेड के बाबुल गांव मे लेबर कामगारों की घरगुती वस्तु किट अवैध तरीखे से रखने का पर्दा फाश,72 घंटे के बाद भी कामगार उपायुक्त की ओर से पोलिस मे FIR क्यू नही ?
मौलाना मुहम्मद हुजैफा गुलाम वस्तानवी का नांदेड़ दौरा, एडवोकेट कासिम वसीम बाबू सेठ के कार्यालय में जोरदार स्वागत.!